सरकारवर टीका करताना चांगल्या कामाची पावतीही द्यावी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी दिला राजकारण्यांना कानमंत्र

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: राज्यकीय नेत्यांनी आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सरकारवर टीका करताना चांगल्या कामाची पावतीही द्यावी. तसंच सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना गोव्याची प्रतिमा खराब होणार नाही याचं भान ठेवावं, असा कानमंत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी गुरुवारी दिला.

मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिस चौकीचं उद्घाटन

सांताक्रुझ पोलीस चौकीचं उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार आन्थोनीयो फर्नांडिस, पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना, पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार, उपमहानिरीक्षक परमादित्य, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, सरपंच नामदेव नाईक, तसंच इतर पोलिस अधिकारी आणि जिल्हा पंच सदस्य उपस्थित होते.

राज्याची बदनामी करणं थांबवावं

राज्यकीय नेत्यांनी राज्यात गुन्हेगारी कारवाया झाल्यास राजकारण्यांवर टीका केली पाहिजे. मात्र पोलीस खात्यावर टीका करून त्यांचं मनोबल खच्चीकरण करू नये. जर पोलिस खात्याकडून काही चुका झाल्या असतील तर सबंधित अधिकारी किंवा मंत्र्याकडे तक्रार करावी. या व्यतिरिक्त राजकारण्यांनी आपल्या राजकीय हेतू साद्य करण्यासाठी सोशल मिडियावर काही पोस्ट टाकून गोव्याच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामाबद्दल विचार करावा. त्यामुळे सबंधितांनी राज्याची बदनामी करणं थांबवावं. जनतेने अशा राजकारण्यांना धडा शिकवला पाहिजे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी यावेळी केलं.

आमदार आन्थोनीयो फर्नांडिस यांनी मानले आभार

सांताक्रुझ मतदारासंघातील सांताक्रुझ, मेरशी आणि चिंबल पंचायत परिसरासाठी पोलीस चौकीची आवशकता होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया होत होत्या. यासाठी अनेकांनी मागणी केली होती. परंतु मागील ३२ वर्षं आदी जमीन संपादन करून काहीच केलं नव्हतं. सरकारने सांताक्रुझ पोलीस चौकी सुरू केल्यामुळे आमदार आन्थोनीयो फर्नांडिस यांनी आभार व्यक्त केले. 

जुने गोवा पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीचं काम हाती घेणार

या पाश्वभूमीवर सांताक्रुझ पोलीस चौकी प्रथम सांताक्रुझ परिसरापूर्ती राहणार आहे. त्यानंतर आव्यशकनुसार विस्तार करण्यात येणार आहे. तसंच इतर विभागही या चौकीतून कार्यवित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त पुढील काही दिवसात जुने गोवा पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीचं काम हाती घेणार असल्याची माहीती पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी दिली.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!