राज्यात अधिकार्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाकडे कुठली जबादारी…

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : गोवा नागरी सेवेतील अधिकार्यांच्या बदल्यांचा आदेश सरकारने जारी केला. संजीव गडकर यांची मोपा विमानतळ प्रकल्पाच्या स्पेशल लँड अॅक्विझिशन ऑफिसर (एसएलएओ) पदावरून संजीवनी साखर कारखान्याच्या प्रशासक पदी बदली केली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नेमणूक केली आहे. विकास गावणेकर यांना सहकारी संस्थांच्या निबंधक पदावरून गोवा मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी आणले आहे. बिजू नाईक यांना सहकारी संस्थांच्या निबंधक पदी नेमले आहे. नितळ आमोणकर यांना गोवा मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदावरून मुक्त केले असून त्यांना संजय स्कूलच्या सदस्य सचिवपदासह मोपा विमानतळ प्रकल्पाच्या स्पेशल लँड अॅक्विझिशन ऑफिसर (एसएलएओ) पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. गोवा मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव पदावरून त्रिवेणी वेळीप यांना दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी पदावर नेमले आहे.
संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी देविदास गावकर यांना गोवा राज्य एससी आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदासह गोवा मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे.