‘अंबे मेटालिक’च्या विस्तारास पिसुर्लेतील नागरिकांचा विरोध…

नैसर्गिक जलस्रोतांसह शेती, बागायतींवर दुष्परिणाम

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : पिसुर्ले येथील अंबे मेटालिक्स स्पंज आयर्न प्लांटच्या विस्ताराला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. रविवारी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पिसुर्ले पंचायतीच्या सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी विस्तार प्रकल्पाला कडाडून विरोध केला.            
हेही वाचाःदेशातील पहिला ‘ट्रान्सजेंडर डॉक्टर’ तेलंगणात!

प्लांटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण

या प्लांटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. आरोग्याच्या समस्यांसह पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. या प्रकल्पाच्या विस्तारामुळे आणखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रकल्प विस्ताराला पर्यावरण दाखला देऊ नये, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.            
हेही वाचाःमराठा आरक्षणासाठी, कर्नाटकात ‘चलो सुवर्णसौध’ जागृती सुरू…

प्रकल्पासंदर्भात व्यवस्थापनाने खोटी माहिती दिली

प्रदूषणाचा त्रास पिसुर्ले, कुंभारखण, होंडा, भुईपाल, सालेली, हरवळे अशा अनेक गावांना होतो. या भागातील नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाले असून शेती, बागायती नष्ट झाली आहे. या संदर्भात तक्रारी करूनही त्याची दखल कोणीही घेत नसल्याचा दावा संतप्त ग्रामस्थांनी केला. प्रकल्पासंदर्भात व्यवस्थापनाने खोटी माहिती दिली.
हेही वाचाः१० नंतरच्या पार्ट्यांबाबत सोमवारी बैठक : देविदास पांगम

प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता दिल्यास ग्रामस्थांचा आंदाेलनाचा इशारा

प्रकल्पापासून अवघ्या काही अंतरावर म्हादई अभयारण्य आहे. वन्यजीवांनाही या प्रकल्पाच्या विस्ताराचा फटका बसू शकतो. स्थानिकांना रोजगार देण्याबाबतही कंपनीचे व्यवस्थापन अपयशी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. स्थानिकांचा विरोध असूनही प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता दिल्यास आंदाेलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचाः‘मोपा’ला भाऊसाहेब बांदोडकरांचेच नाव योग्य!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!