‘लुई बर्जर’ लाचखोरी प्रकरणी कामत, चर्चिल विरोधात चालणार खटला

२८ जुलै रोजी आरोप निश्चित झाली

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि माजी साबांखा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्या २०१५ सालच्या कथित ‘लुई बर्जर’ लाचखोरी प्रकरणी म्हापसा येथील विशेष न्यायालयाने बुधवारी २८ जुलै रोजी आरोप निश्चित केली आहे. दोघांविरुद्ध आता खटला सुरू होईल. तसंच पुढील सुनावणी २ ऑगस्ट रोजी होईल, अशी माहिती आहे.

हेही वाचाः गोव्यातील समुद्र किनारी ‘ब्लू बॉटल जेलिफिश’चा धोका

आम्ही निर्दोष आहोत

यासंदर्भात विरोधी पक्षनेते म्हणाले, आज मला न्यायालयात आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यास हजर राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार मी उपस्थिती लावून याप्रकरणी मी निर्दोष असल्याचं न्यायालयाला सांगितलं, तर चर्चिल आलेमाव यांनी देखील आपण दोषी नसल्याचं म्हटलंय. माझा न्यायालयालावर पूर्ण विश्वास असून मला न्याय मिळेल, अशी खात्री चर्चिल यांनी व्यक्त केली.

हेही वाचाः फेसबूकवर मैत्री, मैत्रीतून भेट, भेटीदरम्यान लैंगिक अत्याचार! दोघे संशयित गजाआड

आता खटला चालणार

हे प्रकरण बुधवारी म्हापसा विशेष न्यायालयासमोर आलं असता न्यायालयाने विरोधी पक्षनेते आणि चर्चिल आलेमांव यांच्यावर आरोप निश्चित केली असून याप्रकरणी आता खटला चालणार आहे. न्यायाधीश शेरीन पॉल यांनी ईडीने विरोधी पक्षनेते आणि माजी साबंखा मंत्री चर्चिल आलेमाव यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात केलेल्या खटल्याची सुनावणी घेतली. सुनावणीवेळी, न्यायालयासमोर दोघांनी या आरोपाबाबत स्पष्टीकरण देत आपण दोषी नसल्याचा दावा केला. त्यानंतर सुनावणी २ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली.

हेही वाचाः ‘सीइसी’च्या शिफारशींवर मत दाखल करू : मुख्यमंत्री

दरम्यान, विरोधी पक्षनेते हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आणि त्यांचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहकारी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी गोव्यात जलवाहिनी बसविण्याच्या कामासाठी लुई बर्जर या अमेरिकन कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | ALLIANCE | विधानसभेसाठी लवकरच युतीची घोषणा?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!