दोन तासाच्या खोळंब्यानंतर चोर्ला घाटाची वाहतूक पूर्वपदावर

Goan Varta Live | प्रतिनिधी
सत्तरी : सोमवारी दुपारी चोर्ला घाटात झाड पडलं होतं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
हेही वाचा : मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही
चोर्ला घाटाच्या अंजुणे धरण परिसर आणि जांभळीकडे येथील घाट मार्गावर सोमवारी दुपारी झाड पडलं होतं. सुदैवानं झाड पडलं, त्यावेळी रस्त्यावर वाहन नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. चोर्ला घाट मार्गावर सोमवारी दुपारी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यानंतर वाळपई अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावर पडलेली झाली हटवली. सुरुवातीला अंजुणे भागातील झाडे आणि नंतर जांभळीकडे भागातील झाड हटवले. वाळपई अग्निशमन दलाचे निरीक्षक संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली.
हेही वाचा : अज्ञात वाहनाची धडक, ५ दुचाकी आणि दोन गाड्यांचं नुकसान

दोन तास वाहतूक ठप्प
दरम्यान झाडं पडल्याने या मार्गावरील वाहतूक दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. झाडे हटवल्यावर केरी वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने घाट मार्गाचा रस्त्याची बाजू दलदलीत झाली आहे. त्यामुळे रस्त्याबाजूची बरीच झाडे वाकलेली असून धोकादायक स्थितीत आहे. रस्त्याच्या बाजूला वाकलेली झाडे तोडावी अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट करणाऱ्या संशयितास अटक