चोर्ला घाटात अवजड वाहतुकीला बंदी

पोलीस आणि वाहतूक खात्याला निर्देश

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई: जून महिन्यात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी चोर्ला घाट परिसरातून अवजड वाहनांना बंदी घातली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याकडे सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले होते. अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या महामार्गाची पूर्णपणे चाळण झालीये. आता पुन्हा १ नोव्हेंबरपासून अवजड वाहनांना बंदी घातली असून त्याची अंमलबजावणी आज मंगळवारपासून कडकपणे होणारे.या संदर्भातील एक महत्वाची बैठक सोमवारी सत्तरी तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला सत्तरी तालुक्याचे मामलेदार दशरथ गावस यांनी वाळपई पोलीस आणि वाहतूक खात्याला कडक निर्देश देताना अवजड वाहतूक झाल्यास कारवाई करण्याचा आदेश दिलाय.

बेळगाव भागातून गोव्याकडे येणारी अवजड वाहने सुरला याठिकाणी अडविण्यात येणार असून त्यांना गोव्यात येण्यासाठी प्रतिबंध करण्यात येणारे.तर गोव्यातून बेळगावच्या दिशेने जाणारी अवजड वाहने होंडा आणि साखळी विठ्ठलापूर या ठिकाणी अडविण्यात येणारेत. यासाठी पोलिसांची खास नियुक्ती करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी आज मंगळवारपासून सुरू होणारे. अवजड वाहनांना बंदी असल्याची सूचना देणारे फलक दोन दिवसांत लावण्यात येणार.अशी माहिती वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहायक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी दिली. मामलेदार दशरथ गावस यांनी उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्या निर्देशानुसार ही बैठक झालेली.या बैठकीत वाळपई पोलीस निरीक्षक, डिचोली पोलीस निरीक्षक, आणि इतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते हजर होते.

हेही वाचा

रेल्वेदुपदरीकरणाविरोधात संघर्ष! मध्यरात्री जनसागर उसळला!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!