चोर्ला घाटाची अक्षरशः चाळण, पावसामुळे घाट आणखी धोकादायक

चोर्ला घाटातून जाताना जरा जपून, खड्ड्यांमुळे घाट धोकादायक

Goan Varta Live | प्रतिनिधी

नगरगाव : सत्तरी तालुक्यातून केरीमार्गे कर्नाटक राज्याशी जोडल्या जाणार्‍या चोर्ला घाटाची अक्षरशः चाळण झाली आहे. या घाटात खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेय. घाटातील खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी अपघातही होण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे चोर्ला घाट धोकादायक बनलाय.

केरी चेकपोस्टपासून चोर्ला घाटासुरु होतो. सुमारे अठरा किलोमीटर रस्ता चोर्ला घाटात मिळतो. या अठरा किलोमीटरच्या मार्गातून जाताना वाहन चालकांना मात्र मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. चोर्ला घाटात सध्या खड्यांची संख्या लक्षणीय आहे. बर्‍याच ठिकाणी वळणावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे गाडी चालवायची कशी, असा प्रश्न वाहन चालकांना सतावतोय.

या घाटातून वाहनांची मोठी रहदारी असते. अनमोड घाट बंद झाल्यापासून सर्वांनी चोर्लातून जाणे पसंद केलंय. मात्र, खड्यांमुळे बाईक आणि फोरव्हिलर चालकांना जीव मुठीत धरून या घाटातून प्रवास करावा लागतोय. खड्डेमय रस्त्यांबरोबरच रस्त्यालगतची जंगली झाडं काही ठिकाणी कोसळत असल्याचेही प्रकार समोर आलेत.

मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार होत आहेत. घाटात आवश्यक ठिकाणी सिमेंटच्या संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देऊन आवश्यक काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!