चोखा राम गर्ग यांच्याकडे गोवा निवडणूक आयुक्तपदाचा ताबा

आर. के. श्रीवास्तव यांच्या जागी वर्णी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कायदा सचिव चोखा राम गर्ग यांच्याकडे गोवा निवडणूक आयुक्तपदाचा ताबा देण्यात आलाय. आर. के. श्रीवास्तव यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होतं.

राज्याचे माजी मुख्य सचिव तथा आयएएस अधिकारी आर. के श्रीवास्तव यांनी गोवा निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणासाठी आपण पदावरून पायउतार होत असल्याचं ते म्हणाले होते. डिसेंबर महिन्यात होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीवास्तव यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं. त्यांच्या जागी कोणत्या अधिकार्‍याची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर कायदा खात्याचे सचिव तथा आयएएस अधिकारी चोखा राम गर्ग यांच्याकडे गोवा निवडणूक आयुक्तपदाचा अतिरिक्त ताबा सोपविण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!