अपात्रता याचिकेवर १२ मार्चला सुनावणी घ्या- चोडणकर

सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आमदार अपात्रता याचिकेवर १२ मार्च रोजी सुनावणी घ्यावी, अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे वकील साहील तगोत्रा यांनी अर्जाद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या वेळापत्रकात तिचा अंतर्भाव नव्हता. त्यामुळे तगोत्रा यांनी अर्ज केला आहे.

हेही वाचा – अपात्रता : सुनावण्या पूर्ण, निवाडा राखीव

चोडणकर यांनी १० बंडखोर आमदारांविरुद्ध दाखल केलेली अपात्रता याचिका सभापतींकडे बराच काळ प्रलंबित राहिली होती. त्यावर लवकर निवाडा देण्याचा आदेश सभापतींना द्यावा, अशी मागणी करणारी याचिका चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर १० फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीवेळी सभापतींनी २६ रोजी याचिका निकालात काढण्याच्या दृष्टीने सुनावणी ठेवल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने त्या याचिकेवरील सुनावणी ८ मार्च रोजी ठेवली होती.

हेही वाचा – बंडखोर आमदार अपात्र होणार ?

२६ रोजी सभापतींनी अपात्रता याचिकेवरील सुनावणी पूर्ण केली असली तरी निवाडा राखून ठेवला आहे. त्यामुळे सोमवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे चोडणकर यांचे लक्ष होते. पण ती वेळापत्रकातच आली नाही. त्यामुळे १२ मार्च रोजी सुनावणी घ्यावी, असा विनंती अर्ज चोडणकर यांनी केला आहे.

सभापतींकडे हस्तक्षेप याचिका दाखल

गिरीश चोडणकर यांच्या अपात्रता याचिकेत हस्तक्षेप करणारी याचिका बाणावलीतील सुशांत रे यांनी दाखल केली आहे. चंद्रकांत कवळेकर यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अपात्रता याचिकेत हस्तक्षेप करण्याची संधी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – हे ‘कॉंग्रेसमुक्त गोवा’चे संकेत की काय?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!