बालकांचं लसीकरण तीन-चार दिवसांसाठी होणार बायणा रवींद्र भवनात

तौक्ते चक्रीवादळात वास्को आरोग्य केंद्राच्या छप्पराची मोडतोड; इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः तौक्ते चक्रीवादळाने बायणातील वास्को आरोग्य केंद्राच्या छप्पराची मोडतोड झाली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील बालकांचा लसीकरण विभाग मंगळवारपासून तीन -चार  दिवसांसाठी बायणा रवींद्र भवनात हलविण्यात आला आहे.

हेही वाचाः गोवा डेअरीच्या प्रशासकांविरुद्ध न्यायालयात जाणार

इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू

मुरगाव पालिका मंडळाच्या इमारतीच्या तळमजल्यावर वास्को आरोग्य केंद्रातर्फे बालकांना लसीकरण करण्यात येतं. परंतु पालिका इमारतीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं आरोग्य केंद्राचा कारभार बायणातील आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीमध्ये पुन्हा हलविण्यात आला आहे.

हेही वाचाः परदेशी गुंतवणुकीत लक्षणीय वाढ, सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशसची भारतात लक्षणीय गुंतवणूक

लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यात करावी लागते कसरत

तेथे येणाऱ्यांना काही गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाली असून मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने त्या रस्त्यावर पाणी जमा होऊन चिखलच चिखल झाला होता. त्यातून मार्ग काढत बालकांना लसीकरणासाठी नेण्यात पालकांना मोठी कसरत करावी लागली. आता तौक्तेचक्रीवादळामुळे त्या इमारतीच्या छप्पराचे काही पत्रे उडाल्यानं तसंच एक झाड त्या इमारतीवर पडल्यानं तिच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राचा कारभार तीन-चार दिवसांसाठी नजीकच्या बायणा रवींद्र भवनामध्ये हलविण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!