चिखली उपजिल्हा हॉस्पिटलचे खासगीकरण होणार नाही

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचं आश्वासन; कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार ठेवणार

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः कोविडची तिसरी लहर कधी येईल हे कुणालाच माहिती नसलं, तरी आरोग्य विभाग परिस्थितीचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा सज्ज ठेवणार आहे. चिखली उपजिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण केले जाणार नाही, असं आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी दिलं. कांसावलीतील टी.बी.कुन्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कांसावलीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड फ्रंटलाइन कामगारांच्या सत्कार करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी हजेरी लावली.

हेही वाचाः शिकारही गेली अन् शिकारीही !

आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम कौतुकास्पद

डॉक्टर, कर्मचारी, पॅरामेडिक्स, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांनी महामारीच्या काळात उत्कृष्ट काम केलं आहे. आम्हाला कोविड योद्धांचा सत्कार करून मुख्यमंत्री, कॅबिनेट आणि आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करायचे होते. ती वेळ फारच कठीण होती. पण आरोग्य कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेत, नि:स्वार्थपणे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले, असं राणे म्हणाले.

हेही वाचाः दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना केवळ भाजपचे वाईट दिवस

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज

तिसरी लाट कधी येईल हे कुणालाच माहीत नाही. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारांची नावं समोर येत आहेत. पायाभूत सुविधांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी मी सतत चर्चा करत आहे. या सर्वांसाठी आम्ही १०० टक्के लसीकरण करण्याचं ठरवलं आहे. आम्हाला सुरक्षित ठेवाण्यासाठी आणि संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी कोविडच्या सर्व एसओपीचं पालन करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही सर्व बाजूने तयारी ठेवणार आहोत. आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा आम्ही तयार ठेवू. चिखली उपजिल्हा रुग्णालयासंबंधी पंचायत मंत्री माँविन गुदीन्होंनी म्हटल्याप्रमाणे आम्ही या रुग्णालयाचं खाजगीकरण होऊ देणार नाही, असं आश्वासन राणेंनी दिलं.

हेही वाचाः ‘डेल्टा प्लस’अलर्ट : ‘सीएम’ नी केली केरी चेकपोस्टची पाहणी !

कोविड काळात वैद्यकीय कर्मचारी स्वतःला विसरले

कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा म्हणाल्या की कोविड योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. कोविड काळात सर्व वैद्यकीय कर्मचारी स्वत:ला विसरले. परंतु आवश्यक ती मदत जनतेपर्यंत पोहोचवण्यात ते चुकले नाहीत. ते प्राणघातक विषाणूचा सामना करत होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!