मुख्यमंत्र्यांचा तथाकथीत ‘स्वयंपूर्ण गोवा चित्ररथ’ महाराष्ट्राच्या वाहनावर स्वार

काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गोंयकारांंचं हीत न जपता गोवा परप्रांतीयांना विकण्याचंच काम करत आहे. गोव्याचे अकार्यक्षम, बेजबाबदार आणि अपयशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तथाकथीत ‘स्वयंपूर्ण गोवा चित्ररथ’ महाराष्ट्राच्या वाहनावर स्वार आहे. यामुळे भाजप सरकार गोंयकारांना डावलुन बाहेरच्यांना संधी उपलब्ध करुन देत असल्याचं परत एकदा सिद्ध झालं आहे, अशी टीका काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

भाजपने राजकीय स्वार्थासाठी केला आई म्हादईचा कर्नाटकशी सौदा

भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी आई म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी सिंधुदुर्गला ऑक्सिजन पाठवण्यासाठी गोव्यात प्राणवायुची कमतरता करुन कोविड रुग्णांचा खुन केला. भाजप नेहमीच गोंयकारांना डावलण्याचं काम करत आहे, असं पणजीकर म्हणाले.

भाजपचं स्वयंपूर्ण गोवा अभियान फसल्याचं उघड

आज स्वयंपूर्ण गोव्याचा ढोल वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दोन चित्ररथांसाठी महाराष्ट्राची वाहनं आणावी लागतात. यावरुन भाजपचं स्वयंपूर्ण गोवा अभियान फसल्याचं उघड होत आहे. गोव्यातील वाहने सदर चित्ररथासाठी का वापरण्यात आली नाही हे भाजपने स्पष्ट करावं, अशी मागणी पणजीकरांनी केली आहे. भाजपने गोव्यातील निवडणुकांसाठी महाराष्ट्राचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक केली आहे. आपली खुर्ची सांभाळण्यासाठीच आणि त्यांच्यावर ‘इंप्रेशन’ मारण्यासाठी डॉ. प्रमोद सावंतानी महाराष्ट्राची वाहनं आणली असावीत.

महाराष्ट्रातील वाहनं ताबडतोब परत पाठवा

सरकारने ताबडतोब सदर चित्ररथासाठी वापरलेली वाहनं परत पाठवून गोंयकारांची वाहनं घ्यावीत. सरकारने यावर त्वरित लक्ष न दिल्यास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सदर चित्ररथ रोखणार असल्याचा इशारा पणजीकरांनी दिला आहे.

हा व्हिडिओ पहाः POLICE| पोलिस खात्याच्या भरतीला प्रचंड प्रतिसाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!