COW ADOPTION | मुख्यमंत्र्यांनी सिकेरीतील गोशाळेतून दत्तक घेतली गाय …

गोमंतकीयांनी गाय दत्तक घ्यावी असे मुख्यमंत्र्यानी केले आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी गुरुवारी सिकेरी मयेतील गोशाळेतून गाय दत्तक घेतली. तिचा पूर्ण वर्षभराचा खर्च त्यांनी स्वत: उचलला आहे. गोमंतकीयांनी गाय दत्तक घ्यावी असे आवाहन डॉ. प्रमोद सावंतांनी यावेळी केले. गाय दत्तक घेतल्याने गाय दान दिल्याचे पुण्य मिळते असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा:TECNO भारतात घेऊन येत आहे पहिला मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन…

रस्ता अपघातात गुरे मृत्युमुखीही पडलीत

गोवा राज्यात रस्त्यांवर अनेक बेवारस गुरं आढळून येतात. तसंच रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यामुळे अपघातही घडण्याचे प्रकार घडतात. यातूनही अनेक चालक जायबंदी झालेत तसंच दगावलेत. रस्ता अपघातात गुरे मृत्युमूखीही पडलीत. या गुरांना कुणी वाली नसल्यानं सिकेरी मयेतील गोशाळा या गुरांच आश्रयस्थान बनलीए.
हेही वाचा:नेपाळ सिमेजवळ आवळल्या मुसक्या…वाचा ‘नूर अहमद’ नेमकं प्रकरण आहे तरी काय?

गायच्या पूर्ण वर्षभराचा खर्च त्यांनी स्वत: उचललाय

सध्या या गोशाळेत जवळपास २५०० गायी आहेत, ज्यांच संगोपन करणं कठीण असल्याने दीपक मणेरीकर यांनी गाय दत्तक घेण्याची एक योजना काढली, त्यातून जवळपास ३६ दाते आत्तापर्यंत गोशाळेला लाभलेत. ही योजना समजताच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील पुढाकार घेऊन गुरुवारी एक गाय दत्तक घेतली असून तिचा पूर्ण वर्षभराचा खर्च त्यांनी स्वत: उचलला आहे.
हेही वाचा:Photo Story | सांताक्रुजचे आमदार रुडोल्फ फर्नांडिस ॲक्शन मोडमध्ये…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!