मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा…

विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील : मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : दापोली (रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी करार करून गोव्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. याविषयी बोलणी सुरू झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून महिन्यापासूनही हे महाविद्यालय सुरू होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
हेही वाचाःड्रोन आणि त्याच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन

राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन

दापोलीचे ‘कोकण कृषी विद्यापीठ’ तसेच ‘कृषी अर्थशास्त्र संस्था, महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जुने गोवा येथे एका हॉटेलमध्ये राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषी संचालक नेविल अल्फान्सो, आयसीएआरचे संचालक प्रवीण कुमार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, कुलगुरु डॉ. विलास भाले, कुलगुरु डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रकाश महिंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचाःलईराईच्या जत्रोत्सवास सुरुवात…

गोव्यात कृषी व्यवसाय मुख्य

गोवेकर नोकरीच्या मागे धावत आहेत. गोव्यात कृषी व्यवसाय मुख्य आहे. त्याला पुन्हा बळकट करण्यासाठी सरकारच कटिबद्ध आहे. गोव्यातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांत जाऊन कृषीविषयक शिक्षण घेतात. त्यामुळे गोव्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. यासाठी सरकारने तयारी दर्शविली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
हेही वाचाःमहाराष्ट्रात ९२ टक्के मशिदींमध्ये भोंग्यांविना अजान!…

कृषी परिषदांमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी अनेक योजना कृषी खात्यामार्फत सुरू आहे. कृषी खाते तसेच जुने गोव्यातील कृषी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. अशा कृषी परिषदांमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते. आत्मनिर्भर भारतासाठी कृषी व्यवसाय आणखी बळकट करणे गरजेचे आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचाःमंत्री गोविंद गावडेंनी पुन्हा सुदिनना डिवचले!

दलालांची संख्या कमी करायला हवी!

कृषी आधारित माल निर्यात करणारा भारत हा मोठा देश आहे. शेतकऱ्यांना आणखी बळकट करण्यासाठी शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यामधील दलालांची संख्या कमी व्हायला हवी. वातावरणात होत असलेला बदल, वन्य प्राण्यांकडून होत असलेली पिकाची नासाडी यांत शेतकरी भरडत आहे. शेतकऱ्यांना योग्य तो फायदा होत नसल्याने ते शतीकडे दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. भाजीपाला फलोत्पादनात स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. या व्यवसायामुळे देशात आर्थिक समृद्धी येणे शक्य आहे.
हेही वाचाःअखेर लोबो दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल, ‘हे’ आहे कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!