मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा १०० टक्के लसीकरणाचा दावा खोटा

प्रशंसा मिळवण्यासाठी आणखी एक जुमला : सरदेसाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात १०० टक्के लसीकरण झाल्याचा जो दावा केला होता तो १०० टक्के खोटा होता, हे आरोग्य खात्यानेच उघड केले आहे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. आरोग्य खात्याने रविवारी जारी केलेल्या बुलेटीनमध्ये सुमारे १,१५२ लोकांनी त्या दिवशी त्यांचा पहिला डोस घेतला आहे, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात दावा केला होता की, गोव्याच्या शंभर टक्के लोकसंख्येला कोविड-१९ चा पहिला डोस मिळाला आहे. तथापि, रविवारी आरोग्य विभागाने त्याच्या कोविड लसीकरण बुलेटिनमध्ये सांगितले की १,१५२ व्यक्तींनी त्यांचा पहिला डोस घेतला आहे.

मुख्यमंत्री आपली अक्षमता लपवण्याचा प्रयत्न करतात

मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रत्येक वेळी आपली अक्षमता लपवण्याचा प्रयत्न करतात. पण, सत्य लपून राहत नाही. त्यांच्या शंभर टक्के लसीकरणाच्या दाव्याच्या बाबतीत असेच घडले आहे, जे आरोग्य विभागाच्या बुलेटिनद्वारे उघड झाले आहे, असे सरदेसाई म्हणाले.

खोटारडेपणा करणाऱ्या या भाजप सरकारला २०२२ मध्ये हद्दपार करावे लागेल

नागरिकांना आता शंभर टक्के खात्री झाली आहे की खोटारडेपणा करणाऱ्या या भाजप सरकारला २०२२ मध्ये हद्दपार करावे लागेल. नाहीतर त्यांचे जुमले चालूच राहतील. गोव्यामध्ये अजूनही कोविडचे रुग्ण आढळत आहेत आणि अलीकडेच बरे झालेल्यांनी लसीकरण घेतलेले नाही. कदाचित प्रमोद सावंत विसरले आहेत की बरे झालेल्या रुग्णांना तीन महिन्यांनंतर लसीकरण घेण्याचा सल्ला दिला जातो, असेही सरदेसाई म्हणाले.

डॉ. प्रमोद सावंत यांची खोटे बोलण्याची सवय गोव्याच्या लोकांसाठी नवीन नाही

डॉ. प्रमोद सावंत यांची खोटे बोलण्याची सवय गोव्याच्या लोकांसाठी नवीन नाही. कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान त्यांनी ग्रीन झोनची बढाई मारली होती आणि त्यांच्या अक्षमतेमुळे गोव्यात कोविडच्या केसीस वाढल्या आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेतही लोकांचे मृत्यू झाल्याचे सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले.

गोव्याचे लोक जागरूक

गोव्याचे लोक जागरूक आहेत आणि सरकारच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर आहे. आतापर्यंत लोकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या खोटारडेपणाची पूर्ण जाणीव झाली आहे, असं गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.    

हा व्हिडिओ पहाः FRAUD | बँकेची नोकरी गेलीच, अटकेची कारवाई

   

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!