मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांकडून लॅपिड यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध…

'एमएफडीसी,' 'ईएसजी' घेणार गंभीर दखल : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : इफ्फीतील ज्युरी प्रमुख तथा इस्रायली दिग्दर्शक नदाव लापीदने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाविषयी केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी निषेध केला आहे. इफ्फीच्या व्यासपीठाचा गैरवापर केला असून ‘एमएफडीसी’ आणि ईएसजी या गोष्टीची गंभीर दखल घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचाः53rd IFFI 2022 | ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रिम्स’ला सुवर्णमयूर…

इफ्फीच्या व्यासपीठाचा गैरवापर

“एक कलाकृती म्हणून याकडे पाहणे अपेक्षित असताना प्रमुख ज्युरीने या व्यासपीठावर असे शब्द वापरणे म्हणजे इफ्फीच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा प्रकार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
हेही वाचाःGoa Crime | सराईत गुंडाला रात्रीच्या काळोखात जबर मारहाण; व्हिडिओ व्हायरल!

इफ्फीचे ज्युरी हेड नेमकं काय म्हणाले?

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं ते म्हणाले.
हेही वाचाःचिंबल येथे हीट ॲन्ड रन अपघातात एकाचा मृत्यू…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!