मुख्यमंत्र्यांची अचानक दिल्लीवारी… कशासाठी?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीला रवाना होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. अचानक त्यांचा हा दौरा निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार कुजबूज सुरू झालीये. सर्वत्र उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौर्‍यामागची कारणं शोधताना विविध अंदाज बांधले जातायत. दिल्लीत अमित शहांशी भेट घेऊन आयआयटी प्रश्नावर चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

सध्या गोव्यात शेळ-मेळावली प्रकरण पेटलेलं असताना मुख्यमंत्र्याचा हा दिल्ली दौरा भुवया उंचावणारा आहे. या दौर्‍यामागची कारणं शोधण्यासाठी सगळेच धडपडतायत. या दिल्ली दौर्‍यामागे दोन कारणं असल्याची शक्यता वर्तवली जातेय. एक म्हणजे खाणींचा प्रश्न सोडविण्यासाठी हा दौरा असू शकतो. गोव्यातील खाणी लवकरात लवकर सुरू व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या दिशेने धाव घेतली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचबरोबर विधानसभा प्रश्नीसुद्धा ही खास दिल्ली भेट असण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

एकूणच काय, तर सगळेत आपापल्या परीने विविध अंदाज बांधातायत. मुख्यमंत्री जोवर आपल्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौर्‍यामागचं गुपित उलगडत नाहीत, तोवर निश्चित काहीच सांगता येणार नाही. मात्र या अचानक आखण्यात आलेल्या दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!