छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचं प्रतिपादन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. सर्व धर्म समाजाला एकत्रित घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. प्रजेला न्याय दिला. देशासमोर एक आदर्श घालून दिला. राजा कसा असावा हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. हिंदवी स्वराज स्थापन करून प्रजेचं रक्षण केलं. हाच आदर्श घेऊन आम्हाला प्रजेसाठी काम करावं लागेल, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी कोरगाव येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केला.

हेही वाचाः सिंधुदुर्गात 7 जूनपासून चौथ्या टप्प्याचे निर्बंध लागू

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

यावेळी कोरगाव सरपंच स्वाती गवंडी, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर, पेडणे मामलेदार अनंत मळीक, प्रा. सुदन बर्वे, पंच उदय पालयेकर, माजी सरपंच तथा पंच सदस्य प्रमिला देसाई, माजी सरपंच उल्हास देसाई, पंच उमा साळगावकर, भाजप पेडणे मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, पंच नानू पालयेकर, उपसरपंच समीर भाटलेकर, कुस्तान कुयेलो, आबा उर्फ नारायण तळकटकर आणि नागरिक उपस्थित होते.

हेही वाचाः CoWIN पोर्टलवर अधिक वेगानं करता येणार बुकींग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं. जसं शिवाजी महाराजांनी सर्व जनतेला सोबत घेऊन राज्य केलं, त्याच पद्धतीने आता राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील जनतेला सोबत घेऊन राज्य करत आहेत. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ते राज्यकारभार करतायत.

हेही वाचाः डॉ. प्रमोद सावंतजी, तुम्ही या गोमंतभूमीचे खरे पुत्र

महासंकट झेललं

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोरोना महामारीचं संकट असतानाही डगमगले नाहीत.  दुसरा कुणी मुख्यमंत्री असतात तर अर्ध्यावर डाव सोडून पळाला असता. हाच सावंत खरा गोमंतकीय रयतेचा राजा असल्याचा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी केला.

हेही वाचाः ‘त्या’ पर्यटकांना त्यांच्या देशात जाण्याची मदत करा

नोकऱ्यांची संधी केवळ पेडणेकरांना

पेडणे मतदारसंघात जे नवीन प्रकल्प होऊ घातले आहेत, त्या प्रकल्पातूनच पेडणेकरांना रोजगार संधी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. त्या संधीचं पेडणेकरांनी सोनं करावं. सरकारी नोकऱ्या सर्वांनाच मिळणार नाहीत. मात्र खाजगी कंपनीतून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील आणि त्या नोकऱ्या पेडणेकरांनाच मिळवून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचाः केरी संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणार; 1000 सुरुची झाडं लावणार

माझ चुकलं असेल तर मला माफ करा

माझ्या या मतदारसंघात मला सर्व सरपंच, पंच, मंडळी, जिल्हा सदस्य कार्यकर्त्ये चांगले मिळालेत. त्यांच्या बळावर आम्हाला हा मतदारसंघ आदर्श मतदार संघ बनवायचा आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची परत एकदा आम्हाला साथ हवी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा रयतेच्या राज्याला सत्ता देऊया. जर माझं काही चुकलं असेल तर जनतेने मला मोठ्या मनाने माफ करावं. मला तुमच्यापासून दूर करू नका. मी मंत्री असलो, आमदार असलो, तरी जनतेची नोकरी करण्यासाठी मी साधा नोकर आहे. जनतेची सेवा करण्यासाठी सेवक आहे, असं आजगांवकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!