नोकरीचं आमिष दाखवून युवक-युवतींची फसवणूक

फोंड्यातील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: नोकरी देतो असं सांगून उसगावातील काही इच्छुक युवक युवतींना सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी संशयितांविरुद्ध फोंडा पोलिसांत फसवलं गेलेल्यांनी तक्रार दिली आहे. प्राथमिक स्वरुपातील या तक्रारीनुसार फोंडा पोलिसांनी संशयितांना बोलावून त्यांची चौकशी सुरू केली आहे. या फसवणूक प्रकरणात नेमके कितीजण गुंतले आहेत, त्याचा तपास पोलिस करीत आहे.

नक्की काय झालं?

उसगावातील काही युवक युवतींना बँकेत नोकरी देतो असे सांगून काही ठेव रक्कम भरण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार काहीजणांनी पन्नास ते दीड लाखापर्यंत रक्कम भरली. ही रक्कम सात ते आठ लाखांपर्यंत असून पैसे जमा केलेल्यांना नव्यानेच सुरू केलेल्या एका तथाकथित पतसंस्थेच्या वास्तूत रोज बसवण्यात येऊ लागलं. मात्र, तीन महिने होत आले तरी पगार न मिळाल्याने आणि काही ग्राहकांकडून जमा झालेले पैसे परस्पर लाटले गेल्याचा संशय आल्याने शेवटी या कर्मचाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली असून पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

फोन बंद

तक्रारदारांच्या निवेदनानुसार फोंडा पोलिसांनी संशयितांशी फोनवरून संपर्क साधला असून काहीजणांचा मोबाईलवर संपर्कच होत नसून फोनच बंद असल्याचं निदर्शनास आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!