शंभरी ओलांडलेल्या लक्ष्मण गावडेंचं योगदान तुम्हाला माहीत आहे?

त्यासाठी हे फेसबूक लाईव्ह बघावच लागेल

Goan Varta Live | प्रतिनिधी

एडव्होकेट शिवाजी देसाई यांनी लक्ष्मण गावडे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पांचा व्हिडीओही त्यांनी शेअर केलाय. शिवाजी देसाई म्हणतात..

ग्रेट भेट

लक्ष्मण भोटू गावडे(101)

लक्ष्मण भोटू गावडे यांच्याशी हितगूज करणे म्हणजे माझे परमभाग्य. आज त्यांनी शंभरी ओलांडली आहे. तरुणाला लाजवेल असा त्यांचा आजही उत्साह. आजही ते स्वतःला तरुणच समजतात. त्यांना सत्तरी तालुक्याचे प्रथम आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जयसिंगराव राणे यांचा सहवास लाभला. सत्तरी तालुक्यात कुमेरी शेतीसाठी जी आंदोलने झाली त्या आंदोलनात श्री लक्ष्मण गावडे यांचा सक्रिय सहभाग होता. ते स्वातंत्र्य सैनिक देखील होते.

परंतु दुर्दैवाने त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता मिळाली नाही. गोवा मुक्त झाल्यानंतर गोव्यात मगो पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि या पक्षाने कुमेरी शेती वर बंदी घातली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. आणि याविरोधात लढा देण्यासाठी गोमंतक शेतकरी पंचायत ह्या संस्थेची निर्मिती लक्ष्मण भोटू गावडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. असे म्हटले जाते सत्तरी तालुक्यात आज् जी सरकारी जमिनीत काजू लागवड केली जाते त्याचे श्रेय जयसिंगराव राणे तसेच लक्ष्मण गावडे व इतरांना जाते.

कुमेरी शेतीसाठी सत्तरी तालुक्यात झालेल्या आंदोलनात प्राध्यापक मधु दंडवते आणि रामविलास पासवान या माजी केंद्रीय मंत्र्यांचा पाठिंबा लाभला. हे दोघे मंत्री त्यावेळी सत्तरी तालुक्यात आले होते. आणि या दोन्ही मंत्र्यांचा गौरव लक्ष्मण गावडे यांनी केला. लक्ष्‍मण गावडे यांनी 100 पेक्षा जास्त गावात जाऊन रणमाले सादर केले आहे. त्यांना अनेक प्रकारे सकराती सादर करता येतात. एवढेच नव्हे तर ते गावठी औषधे देखील देतात.

सत्तरी तालुक्यामध्ये असे अनेक वरिष्ठ नागरिक आहेत ज्यांनी आमच्या सत्तरी तालुक्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. युवापिढीने त्यांच्याकडून शिकले पाहिजे त्यांचे कायम ऋणी राहिले पाहिजे. आजी सत्तरी निसर्गरम्य दिसते ती लक्ष्मण गावडे यांच्यासारख्या वरिष्ठ नागरिकांमुळे.त्यांचा शोध आणि त्यांच्याकडून बोध घेण्याचे काम मी सुरूच ठेवीन.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!