न्यायालयीन कामकाजात 15 जून पासून बदल

सकाळच्या सत्रात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कामकाज सुरू

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : उत्तर तसेच दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयांसह इतर न्यायालये १५ जूननंतर फक्त सकाळच्या सत्रात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याबाबत दोन्ही जिल्ह्यांच्या प्रधान न्यायाधीशांनी आदेश जारी केला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने परिपत्रक जारी करून न्यायालयांसाठी कामकाजांसंबंधी नियमावली जारी केली होती.

हेही वाचाः आजपासून चार दिवस मुसळधार!

१६ एप्रिल रोजी बदल केले होते

उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायमूर्तींच्या समितीने त्यात १६ एप्रिल रोजी बदल केले होते. त्यात दुरुस्ती करून उत्तर गोवा प्रधान न्यायाधीश बी. पी. देशपांडे आणि दक्षिण गोवा जिल्हा प्रधान न्यायाधीश इर्शाद आगा यांनी वरीलप्रमाणे नवीन नियमावली जारी केली आहे.

हेही वाचाः तान्हुल्याच्या अपहरणाने खळबळ; गोमेकॉच्या आवारातील घटना

न्यायालयीन अधिकारी १०० टक्के, कर्मचाऱ्यांची आळीपाळीने ५० टक्के उपस्थिती

न्यायालयीन अधिकारी १०० टक्के तर कर्मचारी आळीपाळीने ५० टक्के याप्रमाणे उपस्थित राहतील. त्यांना सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, नियमावलीत स्पष्ट केले आहे. याशिवाय न्यायालयांना दर शनिवारी सुटी असेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!