चंद्रकांत बांदेकर यांचे खुनी मोकाट; पोलिस स्टेशनवर मोर्चा नेण्याचा शिवसेनेचा इशारा

पेडणे येथे पोलिस स्टेशनवर शिवसेना पेडणेतर्फे धरणे आंदोलन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः सक्राळ तोरसे येथील रेती व्यावसायिक चंद्रकांत बांदेकर या ५५ वर्षीय नागरिकाचा २ जुलै रोजी दिवसा ढवळ्या खून झाला. खून होऊन १५ दिवस उलटले तरीही आजपर्यंत पेडणे पोलिसांनी संशयितांना पकडलेलं नाह. चार दिवसाच्या आत जर संशयितांना पोलिसांनी पकडलं नाही, तर पेडणे पोलीस स्टेशनवर मोर्चा नेणार असल्याचा इशारा पेडणे शिवसेनेतर्फे राज्य उपाध्यक्ष सुभाष केरकर यांना देण्यात आलाय. मालपे पेडणे येथे शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत घनश्याम प्रभुदेसाई, ओंकार प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचाः …तर त्यांची नग्न अवस्थेत धिंड काढा !

२ जुलै रोजी झाला खून

चंद्रकांत बांदेकर यांचा खून २ जुलै रोजी झाला. त्यावेळी त्यांची दुचाकी (जी ए एफ ७१४२) घटनास्थळी सापडलं होतं. चंद्रकांत यांचा मृतदेह हेल्मेट घातलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा तपास गेले १५ दिवस पेडणे पोलीस लावत आहे. मात्र अजून ठोस पुरावे हाती सापडलेले नाहीत.

हेही वाचाः KARNATAKA NEW CM | कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री ठरले

पोलिसांचा तपास अद्यापही सुरू

चंद्रकांत बांदेकर हे तुये येथील एका हॉटेलमध्ये वरचेवर जायचे. त्याठिकाणी पोलिसांनी जाऊन काही धागेदोरे मिळतात का ते पाहिलं. या खुनाचा तपास लावण्यासाठी पेडणे पोलीस स्टेशनवर दोन उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई आणि संदेश चोडणकर, म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी उपस्थित राहून पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना मार्गदर्शन केलं.

हेही वाचाः ढवळीकरांनी मतदारसंघातील नेटवर्कची समस्या सोडवावी

29 जुलै रोजी शिवसेना पेडणेतर्फे धरणे

२९ जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता पेडणे पोलिस स्टेशनवर शिवसेना पेडणेतर्फे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. पेडण्यातील जबाबदार नागरिकांनी तसंच मयत बांदेकर कुटुंबियांच्या हितचिंतकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | FREE INTERNET FOR EDUCATION |मगो नेते प्रवीण आर्लेकर यांची विद्यार्थ्यांसाठी मोफत WIFI सुविधा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!