लिफ्टने केला चंद्रकांतचा घात

संशयित जयपुरी गोस्वामी याला अटक; गुन्हा शाखेकडून कारवाई; संशयिताला गोव्याबाहेर अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भोम मोपा येथील रेती व्यावसायिक चंद्रकांत बांदेकर यांच्या खून प्रकरणातील तपासात पोलिसांनी प्रगती केली आहे. पोलिसांनी संशयित जयपुरी गोस्वामी (वय वर्षं २४, गुजरात) याला अटक केली आहे. गुन्हा शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच निकाल लागेल आणि खरा गुन्हेगार लवकरच गजाआड होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहेय.

हेही वाचाः चंद्रकांत बांदेकर यांचे खुनी मोकाट; पोलिस स्टेशनवर मोर्चा नेण्याचा शिवसेनेचा इशारा

संशयिताला गोव्याबाहेर अटक

चंद्रकांत बांदेकरांचा खून होऊन महिना उलटून गेला तरी पोलिसांच्या तपासाला यश आलं नव्हतं. मात्र पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात आता प्रगती केली आहे. एवढे दिवस पोलिस ज्या संशयिताला गोव्यात शोधत होते, त्याला अखेर गोव्याबाहेर अटक करण्यात आलीये. त्यामुळे लवकरच या प्रकरणामागचा खरा गुन्हेगार गजाआड होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय. तसंच मयत बांदेकरांचा खून नक्की कोणत्या कारणासाठी करण्यात आला, हेदेखील उघड होईल.

2 जुलै रोजी सापडला मृतदेह

सक्राळ येथील रहिवाशी चंद्रकांत बांदेकर याचा मृतदेह मोपा येथील आड रस्त्याच्या बाजूला 2 जुलै 2021 रोजी सापडला. त्याची एक्टीवा स्कुटर रस्त्यालगतच होती. त्याच्या शरिरावर अनेक ठिकाणी घाव होते आणि त्यामुळे त्याची हत्या झाल्याचेच यावरून स्पष्ट झाले. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी हत्या झाल्याचा गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल केला आणि तपासाला सुरूवात केली.
चंद्रकांत बांदेकर याचा संबंध रेती व्यवसायाशी होता आणि त्यामुळे त्यातूनच ही हत्या झाली की काय,असा प्राथमिक संशय होता. काही केल्या या खूनाचा तपास लागत नसल्याने अखेर पोलिस अधिक्षत सोबीत सक्सेना (आयपीएस) यांनी तपासासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या. या एकूणच परिसराच्या अवतीभोवती जिथे जिथे सीसीटीव्ही कॅमेरा होते, त्यांची बारीक तपासणी करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजमधून लागला सुगावा

एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक सुगावा लागला. चंद्रकांत बांदेकर याने पत्रादेवीच्या दिशेने येताना एका व्यक्तीला लिफ्ट दिल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आलं. पोलिसांनी लगेच आपल्या तपासाला गती दिली आणि या अनुषंगाने अनेकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या. अज्ञातस्थळी मृतावस्थेत सापडलेल्या चंद्रकांत बांदेकर याचा मोबाईल, पैशांचे पाकिट आणि एक सोन्याची चेन गायब असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. या अनुषंगाने पोलिसांनी आपल्या तांत्रिक विभागाला सज्ज करून या मोबाईलचा सुगावा लागतो काय, यासाठी तैनात केले.

हेही वाचाः धारबांदोड्याच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध: मुख्यमंत्री

संशयिताकडून खुनाची कबुली

याच ऑगष्ट महिन्यात चंद्रकांत बांदेकर याचा मोबाईल महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एक्टीवेट झाल्याचा सुगावा पोलिसांना लागला. तात्काळ पेडणे पोलिस आणि गुन्हा शाखेच्या पोलिसांची एक टीम तयार करून अमरावतीला पाठविण्यात आली. हा मोबाईल वापरत असलेली व्यक्ती अमरावतीत बादनेरा इथे सापडली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने आपण हा मोबाईल अहमदाबाद- गुजरात येथील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे आपल्या जबानीत सांगितले. पोलिसांनी तात्काळ गुजरातेत कुच करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याने आपल्या जबानीत सांगितले की त्याला हा मोबाईल जयपूरी गोसाई नामक त्याच्या मित्राने दिला होता. हा मित्र त्याच्या भाड्याच्या खोलीतच राहत होता. पोलिसांनी ताबडतोब जयपूरी गोसाई याच्या मुसक्या आवळल्या. त्याने चौकशीवेळी आपला गुन्हा कबूल केला. चंद्रकांतची हत्या केलेले शस्त्र, मोबाईल फोन आणि सोन्याची चेन पोलिसांनी हस्तगत केली. विशेष म्हणजे सोन्याची चेन ही मेल्टेट केल्याचंही आढळून आले.

हेही वाचाः ‘सोशियाद’ची जमीन पुढील सुनावणीपर्यंत ‘जैसे थे’ ठेवा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडलं संशयिताला

पोलिसांनी पुरावा शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यासाठी आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यासाठी अनेक पथके तयार केली. तांत्रिक आणि मानवी बुद्धिमत्तेच्या सखोल विश्लेषणानंतर, महाराष्ट्रातील अमरावती येथे एक संशयित सापडला. पोलिस निरीक्षक राहुल परब आणि लक्ष आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर गोवा आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांद्वारे ताबडतोब आंतरराज्य ऑपरेशन सुरू करण्यात आलं. अखेरीस, या आंतरराज्य ऑपरेशनला यश येऊन जयपुरी गोसाई म्हणून ओळखला जाणारा मुख्य आरोपी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पकडला गेला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचाः वाळपई पोलिस निरीक्षक सागर एकोस्करांची बदली

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना, उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, उपअधीक्षक संदेश चोडणकर, पोलिस निरीक्षक जिवबा दळवी, राहुल परब, लक्षी आमोणकर, विद्यानंद पवार, उपनिरीक्षक संजित कांदोळकर, विवेक हळर्णकर, प्रफुल गिरी, हेड कॉन्स्टेबल इर्शाद वाटांगी, गुरुदास मांद्रेकर, कॉन्स्टेबल सुदेश मटकर, अर्जुन कांदोळकर यांनी या कारवाईत भाग घेतला. संशयिताला गुन्हा शाखेनं पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पेडण्याचे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी माहिती दिली.

हेही वाचाः सर्किट हाऊस सुविधा निविदा पुन्हा जारी करा!

हा व्हिडिओ पहाः DAJI KASKAR ON BABU | बाबू, वीस वर्षांच्या सेवेबद्दल धन्यवाद, आता थांब !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!