गोवा, कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानं वर्तवली शक्यता !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने दुपारी 1 वाजता जारी केलेल्या हवामानविषयक पत्रकात वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!