येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

मंगळवार, बुधवारी पावसाचा येलो अलर्ट; उत्तर, दक्षिण गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाच्या सरींची अधूनमधून हजेरी सुरुच आहे. पण जुलै महिन्यात जसा जोरदार पाऊस झाला होता, तसा पाऊस ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळाला नाहीये. अशातच येत्या 48 तासांत पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचाः धिरयो: चौघांवर गुन्हा नोंद

17 आणि 28 ऑगस्ट रोजी जोरदार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

गोव्यात येत्या उद्या आणि परवा म्हणजे 17 आणि 28 ऑगस्ट रोजी जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पड्याची शरक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांंमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यासहच देशातील बर्‍याच राज्यात हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यलो अलर्ट जारी

येत्या 2 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं, अशी सुचना या यलो अलर्टच्या माध्यमातून देण्यात आलीये. या मुसळधार पावसामुळे येत्या 2 दिवसांत दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचाः कौतुकास्पद! सर्पमित्र प्रचिताच्या धाडसाची गोष्ट

मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये

मासेमाऱ्यांनाही समुद्रात न उतरण्याचं आवाहन केलं जातंय. येत्या 48 तासांत पुन्हा एकदा पावसानं जोर धरला, तर वाढलेलं तापमानही कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय. मात्र कमी अधिक फरकानं एखादीच मोठी सर येऊन जातेय. मुसळधार पावसाची तशी हजेरी गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालेली नाही. आता येत्या 48 तासात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडण्याचा अंदाज आएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील 3-4 तासांत राज्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता

गोवा हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 3 ते 4 तासांमध्ये राज्याच्या काही तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. सत्तरी, धारबांदोडा, केपे आणि फोंडा तालुक्यात ढग दाटून आल्याने या भागात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MISSION 22 PLUS | भाजपचं २०२२साठी संघटनात्मक काम सुरू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!