चाेडणकरांनी केली वाळपईत पूरग्रस्त भागाची पाहणी

पूरग्रस्तांना धान्य वितरित

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः वाळपईत पुरामुळे वाईट परिस्थिती ओवढीलेय. शुक्रवारी संध्याकाळी गाेवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चाेडणकर यांनी या भागाची पहाणी केली. सत्तरी तालुक्यात सुमारे दिडशे कुटुंब पूरग्रस्त झाली आहे. वाळपई शहरात सुमारे साठ घरं पूरग्रस्त झाली असून चाेडणकरांनी त्यांची चाैकशी केली. यावेळी त्याच्या साेबत उपाध्यक्ष संकल्प आमाेणकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी, युवा अध्यक्ष वरद म्हार्दाेळकर, वाळपई गट अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, महिला अध्यक्ष राेशन देसाई तसंच गाेवा प्रदेश युवा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचाः इयत्ता 11 वी डिप्लोमा, विज्ञान शाखेत प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा 31 जुलै रोजी

पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची गरज

पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. सरकार तुटपुंजी मदत करुन नागरिकांची थट्टा करतंं. पण यावेळी त्यांच्या झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी चाेडणकरांनी केली. तसंच पूर येण्यामागचं कारण सरकारने शाेधुन काढावं, असंही चाेडणकर म्हणाले.

हेही वाचाः भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक

राणेंनी मतदारसंघाचा दाैरा करताना केला भेदभाव

युवा अध्यक्ष वरद म्हार्दाेळकर यांनी आरोग्य मंत्री विश्वजित राणेंवर टीका केलीये. म्हार्दोळकर म्हणालेत, विश्वजित राणेंनी मतदारसंघाचा दाैरा करताना भेदभाव केला. यावरून त्यांचं मतदारसंघावरील प्रेम कळून येतं. तसंच सरकारने गाेवा मुक्तीला साठ वर्षं झाल्या निमित्ताने जाे साठ काेटी रुपयांचा निधी आला आहे, ताे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरावा, अशी मागणी केली. यावेळी पूरग्रस्तांना आवश्यक वस्तूंचं वितरण करण्यात आलं.

हा व्हिडिओ पहाः Video | CONGRESS | हायकमांडना भेटून काँग्रेस नेते गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!