शिवोलीतील पेट्रोल पंपाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र रद्द

राज्य बाल हक्क आयोगाची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: शाळा असणाऱ्या ५० मीटर अंतराच्या परिसरात पेट्रोल पंपाला परवानगी नाही, अशा पेट्रोल पंपांच्या विरोधात कारवाई करणं हे राज्य बाल हक्क आयोगाचं काम आहे. ग्रामपंचायत समिती, शिवोली – मार्ना पंचायतीचे अध्यक्ष ग्रेगोरी डिसूझा यांनी केलेल्या याचिकेवर कारवाई करताना, कीर्ती विद्यालय, शिवोलीच्या ५० मीटरच्या परिसरात पेट्रोल पंप असल्याचा आरोप आयोगाने केला आहे. उत्तर प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी एनओसी उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ना हरकत प्रमाणपत्र तत्काळ रद्द केलं आहे, अशी माहिती बाल आयोगाने दिली.

हेही वाचाः भाजप आमदार, मंत्र्यांची शाळा सुरू

नियम सर्वांनी पाळणं आवश्यक

केंद्रीय प्रदषण नियंत्रण मंडळाने नवीन पेट्रोल पंप स्थापित करण्याचे घालून दिलेले नियम सर्वांनी पाळणं आवश्यक आहे. शाळा आणि रुग्णालयांच्या ५० मीटरच्या परिसरात पेट्रोल पंपांना परवानगी दिली जाऊ नये. याबाबतीत निश्चित केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन होत असल्याचं सुनिश्चित केलं पाहिजे, असे बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पीटर एफ. बोर्जेस यांनी सांगितलं.

हेही वाचाः मी बाबू आजगावकरांचा समर्थक नाही

आयोगाने पेट्रोल पंपाची उभारणी करण्याबाबत तत्त्वांचं पालन व्हावं म्हणून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना पत्र लिहिलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!