ऑक्सिजन काँसंट्रेटर्स निर्मितीसाठी केंद्राची योजना ; संशोधन प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन

भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : महामारीचा सामना करण्याच्या लढाईत आवश्यक ठरलेले ऑक्सिजन काँसंट्रेटर्स भारतातच विकसित केले जाण्यास प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत, त्यातील महत्वाचे घटक आणि ऑक्सिजन काँसंट्रेटर्समध्ये नवनव्या संशोधनांसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, अशी संशोधने पाठवण्याचे आवाहनही केले आहे.

प्रस्तावात काय असावं ?

ऑक्सिजन वेगळा करण्याची प्रक्रिया, डिझाईन, विकास आणि महत्वाच्या घटकांचे उत्पादन करण्यासाठी पर्यायी साधने, जसे की व्हॉल्व्ह आणि तेलविरहीत कॉम्प्रेसर, कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिझाईनमध्ये सुधारणा, ऑक्सिजनचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यासाठी ऑक्सिजन फ्लो डिव्हाईस, ऑक्सिजन पातळी जाणून घेण्यासाठी सेन्सर्स आणि इतर यांचा समावेश आपल्या प्रस्तावांमध्ये असावा.

प्रस्ताव कोण पाठवू शकतं ?

शैक्षणिक आणि संशोधन संस्था, प्रयोगशाळा, विद्यापीठे आणि वैद्यकीय शिक्षणसंस्था, स्टार्ट अप्स तसेच उद्योगक्षेत्रांकडून (छोट्या / पोर्टेबल) ऑक्सिजन काँसंट्रेटर्सच्या निर्मितीवर संशोधन प्रस्ताव मागवले आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकी संधोधन मंडळ या केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील संस्थेला हे संशोधन प्रस्ताव पाठवायचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रस्ताव कोणाकडं पाठवायचे ?

उद्योग क्षेत्रातील वैज्ञानिकांनी शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक, अभ्यासकांशी समन्वय साधून एकत्रितपणे संशोधन करावे. या संशोधनांनुसार उत्पादन निर्मिती करण्यासाठी उद्योगक्षेत्रातील भागीदारांना या संशोधनाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी तंत्रज्ञान विकास मंडळाकडे निधीचा प्रस्ताव विचारार्थ पाठवला जाईल. या प्रकल्पाचा कालावधी एक वर्षाचा असेल. यातून भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन काँसंट्रेटर्सची निर्मिती होऊ शकेल. ज्याद्वारे, रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यात मदत मिळेल. या संबंधीचे प्रस्ताव विहित नमुन्यात भरुन SERB चे ऑनलाईन पोर्टल, www.serbonline.in वर 15 जून 2021 पर्यंत पाठवायचे आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!