म्हादई प्रकल्पाला केंद्र सरकारचा ‘हिरवा कंदील’…

दसऱ्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : राज्याच्या महत्त्वाकांक्षी म्हादई प्रकल्पाच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला असून दसऱ्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय जलविद्युत विभागाने म्हादई प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे.
हेही वाचाःPhoto Story | पाटो पणजी येथील ‘ज्ञान सेतू’…

म्हादईच्या विषयावर सरकारच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी

दरम्यान, म्हादईच्या विषयावर जेव्हा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी या विषयी आपल्याकडे अद्याप कोणतीच माहिती पोहचलेली नाही,असं सांगितलं.
हेही वाचाःland Grabbing | जमीन हडप प्रकरणी मामलेदारासह दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी…

दसरा सणानिमित्त सरकारी सुट्टी

दसरा सणानिमित्त सरकारी सुट्टी पाहता केंद्रीय जलविद्युत विभागाने जारी केलेला मंजुरी आदेश पुढील आठवड्यात राज्य सरकारकडे पोहोचणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर मुहूर्त आला असून केंद्राचा आदेश राज्य सरकारपर्यंत पोहोचताच सरकारने प्रकल्पाचे काम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालाला आंतरराज्यीय नदी जल विवाद प्राधिकरण आणि केंद्रीय जल आयोगाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
हेही वाचाःPhoto Story | Navratri Special Day – 5 | हिरवा रंग निसर्गासह पौष्टिक गुण आणि प्रजननक्षमता दर्शवतो…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!