म्हापशात सेंटरींग प्लेट चोरट्यांना अटक

शनिवारी झाली होती चोरी; दोघा संशयितांना अटक; चोरीचा माल जप्त

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: धुळेर येथे बांधकाम प्रकल्पातील गोदामातून 2 लाखांच्या 200 सेंटरींग प्लेट चोरण्याची घटना घडली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी उज्ज्वल सुकुमार बिस्वास (24, सध्या शेळपे धुळेर) आणि प्रेमकुमार गौरचंद पाल (30, मुड्डेर बादे हणजूण) या मूळ पश्चिम बंगालच्या संशयितांना अटक केली आहे. चोरीचा मालासह दोन मालवाहू रिक्षा हस्तगत केलेत.

हेही वाचाः खोर्ली येथे घरावर आंबा पडून हानी

शनिवारी केली चोरी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चोरीची घटना शनिवार 10 ते सोमवार 12 रोजीच्या दरम्यान घडली. याबाबत मंगळवारी मालक विरेश नाडकर्णी (सांतईनेज पणजी) यांनी चोरीची तक्रार दाखल केली. फिर्यादीने धुळेर येथील फेरेरा मानोर या आपल्या बांधकाम प्रकल्पाच्या गोदाम मध्ये 200 लोखंडी सेंटरींग प्लेट ठेवल्या होत्या. सध्या या प्रकल्पाचे बांधकाम बंद आहे. चोरट्यांनी वरील गोदामच्या दरवाजावरील कुलूप तोडून आतील सेंटरींग प्लेट लंपास केल्या होत्या.

हेही वाचाः समाजाच्या विकास, प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहीन

चोरीचा माल जप्त

तक्रारीनुसार पोलिसांनी विश्वसनीय सुत्र आणि सदर भागातील सीसीटिव्ही कॅमेरांची पडताळणी केली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी उज्ज्वल बिस्वास आणि प्रेमकुमार पाल यांना पकडून अटक केली. संशयितांनी चोरीची कबुली दिल्यानंतर संशयित प्रेमकुमार याच्या मुंड्डेर बादे हणजूण येथे घरी ठेवण्यात आलेल्या सर्व चोरीच्या प्लेटस जप्त करण्यात आल्या. शिवाय या प्लेट भरून नेण्यासाठी वापरलेल्या जीए 03 एएच 0528 आणि जीए 03 के 4056 क्रमांकाच्या दोन मालवाहू छोटा हत्ती रिक्षा जप्त करण्यात आल्या.

हेही वाचाः दिल्लीतील चर्च पाडण्यास भाजप-आप जबाबदार, केजरीवाल खोटं बोलले

म्हापसा पोलिसांची कामगिरी

पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई आणि निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिश पोरोब, हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई प्रकाश पोळेकर, राजेश कांदोळकर, अभिषेक कासार व अक्षय पाटील या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!