केपेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

बाळ्ळीत आयोजित योग वर्गात उपमुख्यमंत्री कवळेकर झाले सहभागी

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपेः कोरोना महामारी किंवा विकार शरिरापासून दूर ठेवायचे असतील तर रोज योगाभ्यास करावा, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केलं. केपे तालुक्यात बाळ्ळी, केपे आणि फातर्पा भागात विशेष योग वर्ग दिनाच्या निमित्ताने आयोजित केले होते.

हेही वाचाः सावंत सरकार गोव्याच्या भविष्याशी खेळतंय

बाळ्ळीत आयोजित योग वर्गात उपमुख्यमंत्री झाले सहभागी

यावेळी बाळ्ळी येथे आयोजित केलेल्या वर्गात उपमुख्यमंत्री सामील झाले. त्यांच्यासोबत कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासीओ डायस, बाळ्ळीच्या आरोग्य अधिकारी तुळसी ममता काकोडकर, जिल्हा सदस्य संजना वेळीप, सरपंच राघुनाथ ईकर, उपसरपंच वंदना गांवकर, पंच राजू गोसावी, विष्णू नाईक, प्रतिमा नाईक, माजी सरपंच आणि विद्यमान पंच दिपाली फळदेसाई, केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, पंच प्रज्ञा फळदेसाई, आदी उपस्थीत होते.

नित्य नेमाने योग करावा

फक्त योग दिवस असला तरच आपण योग करायला जातो, त्यापेक्षा नित्य नेमाने आपण योगाभ्यास केला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले. कोरोनाच्या काळात योगाभ्यास नित्य नेमाने करत असलेल्या व्यक्तींना कोरोनामुळे मृत्यूने गाठल्याचं माझ्या ऐकिवात नसल्याचं ते पुढे म्हणाले.

हेही वाचाः पार्सेकर सर लागले कामाला…

आपल्या भाषणात आमदार क्लाफासीओ डायस यांनी उत्तम आरोग्यासाठी योगाला आत्मसात करण्याचे सर्वांना आवाहन केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!