पूर्वकल्पना न देताच पणजी बस स्टॅन्डवरुन हटवल्यानं फळविक्रेते नाराज

'40 वर्षांपासून इथे आहोत, तेव्हा कारवाई का नाही केली?'

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पणजी मनपाने पणजी बस स्टॅन्डवर कारवाई करत फळविक्रेत्यांना हटवलंय. या कारवाईचा फळविक्रेत्यांनी निषेध केला असून या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई करण्यात आल्याच आरोप स्थानिक फळविक्रेत्यांनी केला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास पणजी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बस स्टॅन्डवर जाऊन ही कारवाई केली आहे. अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केल्याचं सांगितलं जातंय.

फळविक्रेते नाराज

अचानक करण्यात आलेल्या या कारवाई फळविक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही कारवाई का केली जात आहे, याबाबत विचारणा एका विक्रेत्यानं जेव्हा कर्मचाऱ्यांना केली, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. केटीसीने सांगितलं म्हणून कारवाई केल्याचं सीसीपीच्या कर्मचाऱ्यांनी म्हटल्याचा आरोप स्थानिक फळ विक्रेत्यांनी केलाय. केटीसी आणि सीसीपी प्रशासन वेगवेगळ्या प्रशासकीय पातळ्यांवर काम करत असल्याचंही फळविक्रेत्यांचं म्हटलंय. ४० वर्ष जुनं काम हटवल्यानं लोकांचं मोठं नुकसान झालंय.

दुष्काळात तेरावा

आधीच कोरोना महामारीत लोकांचं प्रचंड नुकसान झालंय. धंदा नसल्यानं आर्थिक संकटात असलेल्या या फळविक्रेत्यांवरील कारवाई आता त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. सामान्य फळविक्रेत्यांनी या कारवाईमागे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. नेमकी या कारवाईमागची कारणं काय आहेत, हे सीसीपीने आम्हाला स्पष्ट करावं, असंही विक्रेत्यांनी म्हटलंय. वेळच्या वेळी आम्ही भाडं भरत असूनही ही कारवाई का करण्यात आली, असा सवाल काही फळविक्रेत्यांनी उपस्थित केलाय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!