आज CBSE बारावीचा निकाल! इथे चेक करा किती मार्क मिळाले?

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली: सीबीएसई बारावीचा आज दुपारी २ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. हा निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करावा, असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्यामध्ये याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा सीबीएसईनंही रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन पद्धत वापरलीये. तसंच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी म्हणजेच मेरीट लिस्ट जाहीर करणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
मूल्यांकनासंदर्भातील १३ सदस्यीय समीतीने मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचं नियोजन यापूर्वीच जाहीर केलं होतं. या नुसार १२ वीचा निकाल जाहीर करताना त्यामध्ये १० वीच्या गुणांचाही विचार करण्यात येणार आहे. दहावीच्या गुणांना ३० टक्क्यांपर्यंत महत्व या निकालाला दिलं जाणार आहे. तसंच ११ वीच्या निकालाचं महत्व ३० टक्के आणि १२ वीमधील कमागिरीसाठी ४० टक्क्यांपैकी गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये चाचणी परीक्षा, प्री बोर्ड एक्झामच्या गुणांचा विचार केला जाईल असं सांगण्यात आलंय.
हा व्हिडिओ पहाः VIDEO | सरदेसाई म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी
सीबीएसईने १० वी आणि १२ वीला बाहेर बसलेल्यांची परीक्षा ऑगस्ट १६ ते सप्टेंबर १५ दरम्यान घेतली जाणार असल्याचं सांगितलं आहे. नवीन मूल्यांकन पद्धतीने या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करता येणार नसल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. हे विद्यार्थी सीबीएईच्या शाळांमधीलच आहेत असं नसून आधीच्या गुणांचा आधार यांचा निकाल लावताना घेता येणार नाही असं बोर्डाने म्हटलंय. विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येतील.
हा व्हिडिओ पहाः Video | Breaking | Bank | RBI | म्हापसा अर्बननंतर मडगाव अर्बन बँकेलाही फटका
निकाल कुठे पाहायचा?
cbse.nic.in , cbseacademic.nic.in , digilocker.gov.in या वेबसाईट्सवर निकाल पाहायला मिळू शकेल.
कसा पाहायचा निकाल?
सीबीएसईच्या cbse.nic.in या वेबसाईटवर जा
होमपेजवर ‘रिझल्ट’ टॅबवर क्लिक करा
स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल
त्यानंतर पर्याय निवडा
त्यानंतर विचारलेले क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल