CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा ठरल्या

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Date Sheet) 10वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं आहे. अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या कालावधीमध्ये ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येऊ शकेल.

सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरु होणार असल्याची माहिती ट्विट करुन शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. हळूहळू कोरोनातून आपण मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत असल्याचं रमेश पोखरियाल म्हणाले.

विद्यार्थ्यांना परीक्षेचे ऍडमिट कार्ड एप्रिलममध्ये मिळण्याची शक्यताय. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आलाय. त्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत.

वेळापत्रक कुठे पाहाल?

सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या.

[email protected]’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.

यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता 10वी किंवा 12वीचं वेळापत्रक पाहता येईल

या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंटही करता येईल.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रॅक्टिकल परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असं बोललं जातंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!