Board EXAMS | सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता सीबीएसई बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सीबीएसईनं दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दहावीचं कसं मूल्यमापन?

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेऊन गुण दिले जाणार आहेत. कामगिरीच्याआधारे दिलेल्या गुणांविषयी ज्यांना हरकत असेल त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. मात्र ही परीक्षा कधी होणार तसेच बारावीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक या संदर्भातले निर्णय जून महिन्यात घेतले जाणार आहेत. १ जून २०२१ रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवा निर्णय जाहीर केला जाईल. सीबीएसई बोर्डाचे अधिकारी १ जून २०२१ रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणा असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

हेही वाचा – Crime | राज्यात महिला असुरक्षित? साखळी पाळी काटा इथं महिलेला लुटून मारहाण

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावून त्यांची परीक्षा घेणे धोक्याचे ठरू शकते. या निमित्ताने होणाऱ्या प्रवासात विद्यार्थ्यांना कोरोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला.

हेही वाचा – देशात गेल्या 24 तासांत 1 हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू, रुग्णवाढही दोन लाखाच्या जवळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!