वाळपई गोशाळेतील गुरांचा पुरामुळे मृत्यू

अनेक गुरं गेली वाहून; गोशाळेतील इतर लाखो रुपयांच्या सामानाचंही नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः शुक्रवारी राज्यात पूरस्थिती निर्माण झाली. मागचे काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांना पूराचा तडाखा बसला. गेले 2 दिवस राज्यात सर्वच तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था थंडवली. माणसाने कशीतरी कसरत करत आपला जीव वाचवला, मात्र यात पूरात नाहक बळी गेला तो मुक्या प्राण्यांचा. वाळपईतील गोशाळेत पुरामुळे गुरांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडलीये.

20 गुरांचा मृत्यू

शुक्रवारी निसर्गाने पुन्हा एकदा आपलं रौद्ररुप दाखवलं. निसर्गावर माणसाकडून होणारे वार, त्याचं प्रत्युत्तर निसर्ग किती कठोरपणे देऊ शकतो हे पुन्हा एकदा शुक्रवारी राज्यात आलेल्या पुरामुळे दिसून आलं. सत्तरीत अनेक गावांमध्ये पाणी भरल्यानं गावांचा संपर्क तुटला. वाळपईच्या गोशाळेतील २० गुरांना या पुरामुळे मरण आलं. तर साधारण २० गुरं पाण्यात वाहून गेल्याचं समजतंय. या नुकसानासोबतच गोशाळेतील इतर लाखो रुपयांच्या सामानाचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय.

शुक्रवार ठरला घातवार

शुक्रवारी राज्यातील नद्यांनी आक्रमक रूप धारण केल्याने लोकांची तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळपर्यंत राज्यात ८६.५० इंच पावसाची नोंद झाली होती. मागच्या २४ तासांत सांगेत सर्वाधिक ८.५ इंच पावसाची नोंद झाली. तर साखळीत ७, केपेत ६, फोंडा, काणकोण, ओल्ड गोव्यात प्रत्येकी ४ इंच पावसाची नोंद झालीये. एकूणच परिस्थिती पाहता लोकांना अजूनही सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Heavy Rain | Flood 2021 | वाळपईत मुसळधार पावसानं संसार उद्ध्वस्त घरं पडल्यानं कुटुंब बेहाल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!