CAR ON FIRE | मडगावात कारला आग

नगरपालिकेसमोर उभ्या कारने घेतला पेट; 3 लाखांचं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मडगावात शनिवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडलाय.  नगरपालिकेसमोर उभी करून ठेवलेल्या कारने रात्री अचानक पेट घेतलाय. या आगीत कार मालकाचं सुमारे तीन लाख रुपयांचं नुकसान झालं अशी माहिती मडगाव अग्निशामक दल कार्यालयाकडून देण्यात आली.

हेही वाचाः FIRE | हॉस्पिटल ऑन फायर; मुंबईत कोविड रुग्णालयांमध्ये अग्नितांडव सुरूच

नक्की काय घडलं?

शनिवारी रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय. मडगाव पालिका इमारतीच्या समोर ही घटना घडलीये. कारचं इंजिन जास्त तापल्याने ही आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचाः FIRE | नागपूरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव; तीन रुग्णांचा मृत्यू

सुमारे 3 लाखांचं नुकसान

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागून जळालेली कार (क्र. जीए 08 एफ 7395) विशाल म्हापसेकर यांच्या मालकीची असून शनिवारी सायंकाळी ही कार मडगाव पालिका कार्यालयासमोर उभी करण्यात आली होती. गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला व काही कालावधीतच गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळेपर्यंत सुमारे अर्ध्या तासाचा वेळ लागला. या कालावधीत कारचं मोठं नुकसान झालं. सुमारे तीन लाखांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक जवानाकडून प्राप्त झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!