भरधाव कार घरात शिरली, अन्..

कोलवा पोलिस स्टेशन समोर असलेल्या घरात भरधाव कार शिरली.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

मडगावः भरधाव कार घरात घुसल्याचा प्रकार कोलवा येथे घडलाय. ही घटना आज पहाटे २.४५ च्या सुमारास कोलवा पोलिस स्टेशन समोर असलेल्या घरात घडलीये.

नक्की काय घडलं?

आज सकाळी एक भरधाव कार कोलवा पोलिस स्टेशन समोर असलेल्या घराच्या कुंपणातून थेट घरात घुसली. कारचा वेग एवढा जास्त होता की ती कुंपणातून थेट घरात आली. हा प्रकार पहाटे २.४५च्या सुमारास घडला. त्यामुळे घरातील माणसं गाढ झोपेत होती. कार घरात शिरल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे सगळे गडबडून जागे झाले. नक्की कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी सगळे बाहेर आले, तर हा प्रकार बघून सगळे घाबरले.

….शॉर्टकटने गेले नसते तर कदाचित अपघात टळला असता!

मालमत्तेचं झालं नुकसान

कार घरात शिरेपर्यंत चालकाला काय घडलं हे समजलंच नाही. कारचा वेग जास्त असल्यामुळे ती थेट कुंपणातून घरात शिरली. या सगळ्यात बागेतील फुलझाडांचं, घराच्या छप्पराचं, घरातील थोड्याफार साहित्याचं, तसंच गाडीचं नुकसान झालंय. कार चालकालाही किरकोळ दुखापत झालीये.

कशामुळे घडला अपघात?

गौरांग प्रकाश नाईक या कार चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने हा अपघात घडला असल्याचं समजलंय. कार चालक दारूच्या नशेत असल्यानं त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट घरात शिरली, असं घराच्या मालकाने सांगितलंय. अजून सविस्तर माहिती हाती आलेली नाहीये.

कार चालकावर गुन्हा दाखल

दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हा आहे. कोलवा पोलिसांनी एमव्ही कायद्याखाली कार चालकावर गुन्हा दाखल केलाय. अपघातानंतर कार चालकाला आरोग्य तपासणीसाठी नेलं असता त्याने तिथून पळ काढला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

हेही वाचा – बापरे! कोरोनाची लस दिल्यानंतर 29 जण दगावले! कुठे?

Fact Check | गोविंद गावडे शेळ-मेळावलीप्रकरणी धडधडीत खोटं बोलले?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!