ACCIDENT | कारचा अपघात; दोघे जखमी

अपघातातील दोघा जखमींवर बांबोळीतील गोमेकॉत उपचार सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः धुळेर म्हापसा येथे कारने एका दुकानाला जोरदार धडक दिलीये. या अपघातात दोघे जखमी झालेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

नक्की कसा झाला अपघात?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडला. कार चालक दिलीप नाईक आपल्या कारने धुळेर येथील घराच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या सोबत पत्नी विद्या व भाचा शश्वांक हे दोघे गाडीत होते. धुळेरातील वाळेक दुकानाजवळील एका जनरल स्टोअरच्या बंद शॅटरवर कार आदळली. कार जोरदार आदळल्याने हा अपघात घडला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

दोघे जखमी

सुदैवाने कार जेव्हा दुकानाच्या शॅटरवर आदळली तेव्हा तिथे कुणी उपस्थित नव्हतं. मात्र कारची धडक जोरदार असल्याने कारमधील विद्या नाईक (51) व शश्वांक मोरजकर (24) हे जखमी झालेत. शश्वांक मोरजकर यांच्या डोक्याला, तर विद्या नाईक यांच्या पायाला दुखापत झाली. अपघातातील दोघा जखमींवर बांबोळीतील गोमेकॉत उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमी चालक दिलीप नाईक यांच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आलेत.

कारचं नुकसान

या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र कारचं बरंच नुकसान झालंय. जीए 03 पी 4714 क्रमांकाच्या रेनॉल्ट पल्स कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.

अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलिस हवालदार तुळशीदास नारोजी यांनी केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!