काणकोणचं राजकारण अगदी खालच्या पातळीवर: मनोज परब

काणकोण येथे घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना केली भाजपवर टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण: काणकोणचं राजकारण अगदी खालच्या पातळीवर पोचलं आहे. इथे प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत असलेला दिसून येतो. येथील आमदार काणकोण मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी भाजपाच्या कळपात गेला, परंतु हवा तसा विकास झालाच नाही. कारण ते दूरदृष्टी नसलेले, दिशाहीन, अकार्यक्षम असल्यानं हे झालं आहे, असं प्रतिपादन रिव्होल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) प्रमुख मनोज परब यांनी काणकोण येथे घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना केलं.

हेही वाचाः नारी शक्ती हे देवीचं रूपः सुखप्रीत कौर

लोकप्रतिनिधींनी स्वतःचा विकास साधला

आतापर्यंत या मतदारसंघात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी स्वतःचा विकास साधला. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबत देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या वाढणाऱ्या उत्पन्नावरून हे दिसून येतं. येथील लोकप्रतिनिधी गब्बर होत चाललेत, तर सामान्य लोकांची आर्थिक स्थिती मात्र दिवसेंदिवस खालावत चालली आहे, असं परब म्हणाले.

हेही वाचाः DELTA VARIANT | डेल्टा व्हेरियंटचे आणखी 64 रुग्ण समोर

परंतु ती केवळ पोकळ घोषणा ठरली

काणकोणच्या शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषीघर बांधण्यात येणार असल्याचं एक वर्षापूर्वी घोषित करण्यात आलं होतं. परंतु ती केवळ पोकळ घोषणा ठरली आहे. या मतदारसंघात मासळी बाजार प्रकल्पही नाही. मात्र दिड कोटी रुपयांचं सुलभ शौचालय बांधलं आहे. या संदर्भात गौप्यस्फोट करण्यासाठी माहिती हक्क कायद्यानुसार माहिती मिळवणार आहोत, अशी माहिती परबांनी दिली.

हेही वाचाः गुंड अनवर शेख हत्याप्रकरणी इमरान चौधरीला अटक

अनेक गावं मुलभूत सुविधांपासून वंचित

गोवा मुक्ती दिनाची ६० वर्षं साजरी करत असलो, तरी मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी, वीज अनेक ग्रामीण भागात अद्यापही नाही आहेत. आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी यांची अवस्था दयनीय झाली आहे. ग्रामीण भागातील काही आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नाहीत. गेल्या ६० वर्षांत या भागातील आमदारांनी केलं तरी काय? असा प्रश्न परबांनी बोलताना उपस्थित केला.

हेही वाचाः SHOCKING VIDEO | हत्येचा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद

आमदार अज्ञानी असल्यानं त्यांच्याकडून या बिलाचं स्वागत

कोमुनिदाद जमिनीवर परप्रांतीयांनी केलेल्या अतिक्रमाणा संदर्भात त्यांनी यावेळी अनेक उदाहरणे परबांनी दिली. त्यांना गोवा सरकारने आणलेलं भूमी पुत्र बिल कसं फायदेशिर आणि मूळ गोंयकारांना किती हानीकारक आहे, याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. आमदार अज्ञानी असल्यानं त्यांनी या बिलाचं स्वागत केल्याचं ते बोलताना म्हणाले.

हेही वाचाः डिजिटल मीटरला विरोध; उद्या हायकोर्टात याचिकेवर सुनावणी

स्वार्थाचं राजकारण सुरू

काणकोण आणि सत्तरीतील जमिनी वनखात्याच्या अखत्यारित येतात. त्यामुळे दोन्हीकडील जमिनीच्या समस्या समान असल्याचं परब म्हणाले. मूळ गोंयकारांसाठी कायदा करण्याचं सोडून परप्रांतीय नवीन लोकांना भूमी पुत्र करून घेण्याच्या स्वार्थाचं राजकारण सुरू आहे. गोंयकार या राजकारणाला विटले आहेत. त्यांना बदल हवा आहे, असं परब म्हणाले.

हेही वाचाः शॉर्ट सर्किटमुळे वाळपईत घराला आग

काँग्रेस, भाजपला लोक विटलेत

नंतर त्यांनी आरजीचं राजकारणात पदार्पण होण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. काँग्रेस, भाजपला लोक विटले आहेत. इतर राजकीय पक्षांपेक्षा आमचं कार्य हे मूळ गोंयकारांच्या हिताचं असेल, असं परब म्हणाले. खाजगी कंपन्यांच्या मध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही, परप्रांतियांना कामावर घेतलं जातं, यावर कुणाचं नियत्रंण नाही. खाजगी कंपन्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हायलाच हवा. सध्याच्या राज्यकर्त्यांनी गोंयकारांना बेघर, बेरोजगार आणि लाचार केलं आहे, असा आरोप परबांनी केला.

हा व्हिडिओ पहाः Video | TRIBAL BHAVAN COUNTRAVERSY| गोमंतक गौड मराठा समाज रजिस्ट्रेशन नंबर १०८चा ट्रायबल भवनाला विरोध

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!