‘नीट’ २०२१ मध्ये एस्टेलर अकादमीच्या अभिदा बारेंटोची कौतुकास्पद कामगिरी

७२० पैकी ६८० गुण मिळवून गोव्यातील सर्वोत्कृष्ट स्कोअर मोडला; पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: एनईईटी (नीट) २०२१ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी एस्टेलर अकादमी त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह पुन्हा चर्चेत आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अप्रतिम निकाल देण्याचा वारसा एस्टेलर अकादमीने कायम ठेवला आहे.

नीट २०२१ मध्ये गोवा राज्यात अभिदा बारेंटो टॉपर

नीट २०२१ मध्ये गोवा राज्य टॉपर अभिदा बारेंटो ही एस्टेलर अकादमीची विद्यार्थिनी आहे. अभिदाने नीट (यूजी) मध्ये ७२० पैकी ६८० गुण मिळवून गोव्यातील सर्वोत्कृष्ट स्कोअर मोडला आहे. ती आता पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक आहे.

एस्टेलर अकादमीचे उत्कृष्ट कामगिरी केलेले इतरही अनेक विद्यार्थी आहेत. यापैकी क्रिस्टले परेराने ७२० पैकी ६०२, हिबा सौदागरने ७२० पैकी ६०१ गुण मिळवले. याशिवाय ५०० पेक्षा जास्त गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी आहेत.

एस्टलरच्या प्रशिक्षणाने तयारीसाठी आवश्यक असलेली धार दिली

क्रिस्टले परेरा म्हणाला, एस्टेलर अकादमी निवड करण्याचा मला मार्ग दाखवल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. एस्टलरच्या प्रशिक्षणाने मला माझ्या तयारीसाठी आवश्यक असलेली धार दिली.

माझे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार

हिबा सौदागर म्हणाली, एस्टेलर अकादमीमुळे माझे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन आणि शिकवण्याच्या कौशल्यामुळे मला नीट ‘क्रॅक’ करण्यात मदत झाली.

आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण

संस्थापक आणि संचालक योगेंद्र सिंग सिकरवार म्हणाले की, आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. कारण आमची विद्यार्थिनी अभिदा हिने स्टेटईन नीट (यूजी) मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिने गोव्यात नीटमध्ये सर्वाधिक गुण मिळवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

‘मॉकटेस्ट’मुळे सरावास झाली मदत

अभिदा ‘नीट’सारख्या कठीण राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ७२० पैकी ६८० गुण मिळवून ‘नीट’साठी गोव्यात आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोअर केलेल्या अभिदा बारेंटो हिने प्रतिक्रिया देताना सांगितलं, एसएससीपर्यंत कोणतेही ट्यूशन न घेता माझी मी शिकले. त्यानंतर माझ्या पुढील शिक्षणासाठी एस्टेलर अकादमीची मी निवड केली. कोविड महामारीमुळे आमची शाळा तसेच कोचिंग क्लासेस दोन्ही ऑनलाईन होते. तथापि, वर्गात घेतलेल्या अनेक ‘मॉकटेस्ट’मुळे मला निर्धारित वेळेत परीक्षेचे पेपर लिहिण्याचा सराव करण्यास खूप मदत झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!