सीएएम प्रीमियर फुटबॉल स्पर्धा ६ रोजी…

जीएफए प्रोफेशनल लीगचा शानदार शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : सीएएमपी ग्रुप या नावाने ओळखल्या जाणार्‍या बहुप्रतिक्षित जीएफए प्रोफेशनल लीगचा बुधवारी शहरातील एका हॉटेलमध्ये शानदार प्रक्षेपण सोहळ्यासह अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला. या प्रीमियर फुटबॉल स्पर्धेची सुरुवात ६ डिसेंबर रोजी वेळसांव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब आणि गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लब, कुडचडे यांच्यात दुळेर-म्हापसा येथील जीएफए स्टेडियमवर पहिल्या सामन्याने होणार आहे.
हेही वाचाःप्रेम स्वीकारण्याचा प्रवास – द ब्लू कफ्तान…

उपविजेत्यांना मिळणार ३ लाख रुपये

गोवा फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष अँटोनियो पँगो म्हणाले, सीएएमएस प्रोफेशनल लीग २०२२-२३ च्या बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली आहे. मागील हंगामातील चॅम्पियन्सच्या तुलनेत चॅम्पियन्सना यावेळी तब्बल ५ लाखाचे बक्षीस, तर उपविजेत्यांना ३ लाख मिळणार आहेत. त्याशिवाय सामनावीर पुरस्कारही देण्यात येणार आहे.
हेही वाचाःप्रादेशिक भाषा संपू देऊ नका : प्रसून जोशी…

स्पर्धेत अकरा संघांचा समावेश

येत्या ६ डिसेंबर रोजी सुरू होणारी सदर लीग अकरा संघांसह खेळली जाणार आहे. यामध्ये धेंपो एससी, स्पोर्टिंग क्लब डी गोवा, साळगावकर एफसी, एफसी गोवा, चर्चिल ब्रदर्स एससी, सेसा एफए, वेळसांव एससीसी, गार्डियन एंजेल एससी, वास्को एससी, पणजी फुटबॉलर्स आणि कलंगुट असोसिएशन.   
हेही वाचाःराय येथील अपघातात एक जखमी…

   

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!