कळंगुट पंचायतीने उगारला कारवाईचा बडगा

दोन डान्सबार केले सील

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा सरकारने पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी व्यावसायिकांना अवैधकृत्यांना आळा घालता यावा या उद्देशाने काही नियम लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर कळंगुट ग्रामपंचायतीने 4 डिसेंबर रोजी वाढत असलेल्या बेकायदा कृत्यांवर आळा म्हणून डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पंचायतीने काल रात्री उशिरा दोन डान्सबार कारवाईचा बडगा उगारला आहे.

डिसेंबर रोजी रात्री दोन डान्सबार सील केले

मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट पंचायतीने घेतलेल्या निर्णानुसार 5 डिसेंबर रोजी रात्री दोन डान्सबार सील केले आहेत. यामध्ये खोब्रावाडा येथील थ्री किंग्ज प्रेमियम व डेवील या डान्सबारचा समावेश आहे.

हेही वाचाः‘लाला की बस्ती’ मधील सात भाडेकरूंना अटक…

कारवाईनंतर पंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या डान्सबारकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंचायतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आणि ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाईचा सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

…म्हणून कळंगुट पंचायतीने घेतला बंदीचा निर्णय

कळंगुट पंचायतीने सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. याबाबत माहिती देताना कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा म्हणाले की, सोमवारपासून बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी आणण्यात येत आहे.

कळंगुट येथे दोन दिवसांपुर्वी कर्नाटकी तरुणांकडून स्थानिक तरुणांना मारहाण झाली आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचाःआश्वे-मांद्रे येथे पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा नोंद…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!