CURFEW | गोव्यात ७ जूनपर्यंत कर्फ्यू वाढवला

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतः दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच अधिकृत आदेश होणार जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने 9 मे पासून राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा केली होती. हा कर्फ्यू 23 मे पर्यंत असणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र 23 मे रोजी राज्यव्यापी कर्फ्यूचा कालावधी वाढवून 31 मे पर्यंत करण्यात आला. आता पुन्हा एकदा कर्फ्यूचा कालावधी वाढवत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता कर्फ्यूचा हा कालावधी वाढवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

शनिवारी केली घोषणा

राज्यव्यापी कर्फ्यूचा कालावधी 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. राज्याच्या किनारपट्टीवरील भागात कोविड-19 च्या संसर्गात वाढ झाल्यानंतर सुरुवातीला 9 मे रोजी पंधरवड्यासाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती.

हेही वाचाः तुयेवर अन्याय नाही; पण आयआयटीचं पेडणे तालुक्यात स्वागत

लवकरच अधिकृत आदेश जारी

शनिवारी मुख्यमंत्र्यांनी कर्फ्यूचा कालावधी 7 जूनपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. मात्र याविषयीचा अधिकृत आदेश अजून जारी करण्यात आलेला नाही. लवकरत उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी याविषयीचा अधिकृत आदेश जारी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

हेही वाचाः दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची संख्या रोडावली

शुक्रवारी 32 लोकांचा कोविडमुळे मृत्यू

राज्यातील कोरोना आकडेवारी अजून म्हणावी तशी कमी झालेली नाही. कोविडमुळे रोज 30 च्या वर मृत्यू होत आहेत. शुक्रवारी 32 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्याची एकूण मृत्यू आकडेवारी आता 2,570 वर जाऊन पोहोचलीये. शुक्रवारी गोमेकॉत 18, दक्षिण गोवा इस्पितळात 10, दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात 3, तर उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात 1 मृत्यू झाला. यातील दोघांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!