कोविड तपासणीविना पळालेली बस पाठलाग करून पकडली

गुरुवारची घटना; दोघांना अटक; पेडणे पोलिसांची कामगिरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोविडबाबत तपासणीसाठी चेकनाक्यावर न थांबता पसार झालेली एक बस पोलिसांनी पाठलाग करून पकडली व दोघांना अटक केली. ही घटना गुरुवारी सकाळी पत्रादेवी येथे घडली. २१ रोजी असाच प्रकार येथे घडला होता. त्यावेळी तिघांवर गुन्हा नोंद केला होता.

दोघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार जीए०७एफ-८९७५ ही प्रवासी बस सकाळी सव्वा नऊ वाजता नाक्यावर पोचली होती; परंतु कोविडबाबत तपासणीसाठा नाक्यावर न थांबता प्रवाशांना घेऊन थेट गेल्याने पोलिसांनी पाठलाग करून ती अडवली. दसराज गौदर (मडगाव) आणि शबीर सैद (मालाड, मुंबई) यांना ताब्यात घेतलं आणि भारतीय दंड संहितेच्या २६९, २७९, १८८ कलमांखाली गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

बाहेरून गोव्यात येणाऱ्यांसाठी कोरोनाचे दोन्ही डोस घेणं सक्तीचं

बाहेरून जी वाहने प्रवासी घेऊन गोव्यात येतात, त्या प्रवाशांकडे कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र आहे की नाही, याची माहिती नाक्यावर देणं सरकारने बंधनकारक केलं आहे. मात्र काही बसेस येथे न थांबता सरळ निघून जातात, असं आढळून आलं आहे. पत्रादेवी नाक्यावर कोविड तपासणी चुकवण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. अनेक बसवाले नाक्याअलीकडे प्रवाशांना उतरवतात आणि खालच्या रस्त्याने चालत पुढे जायला लावतात. काही वाहनचालक जुन्या चेकपोस्टजवळील रस्त्याने वाहन दामटतात. तसंच अनेक वाहन नाक्यावर न थांबता तशीच पुढे निघून जातात.ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!