राज्यात बीएसएनएल सेवा विस्कळीत; GVK EMRI कडून पर्यायी संपर्क क्रमांक जारी

इमर्जन्सी असल्यास 832- 6656969 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात सर्वोत्तम नेटवर्कचा दावा करणाऱ्या बीेएसएनएल कंपनीच्या नेटवर्क सेेवेला पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीएसएनएल नेटवर्क सेवा ग्रामीण तसंच शहरी भागांत ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकांना संपर्क करण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय.

हेही वाचाः निसर्गाचा प्रकोप! मोठी दुर्घटना! तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा बळी

संपर्क करण्यासाठी GVK EMRI ने जारी केला पर्यायी क्रमांक

बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्याने ‘जीव्हीके ईएमआरआय’ (इमर्जन्सी मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्सिट्यूट) (GVK EMRI (Emergency Management and Research Institute) च्या संपर्क सेवेवर त्याचा मोठा परिणाम झालाय. बीएसएनएल नेटवर्क ठप्प झाल्याने 108 क्रमांकावर संपर्क होऊ शकत नाहीये. त्यामुळे GVK EMRI ने निकडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका हवी असल्यास संपर्क करण्यासाठी पर्यायी क्रमांक जारी केलाय. इमर्जन्सी असल्यास 0832- 6656969 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन GVK EMRI कडून करण्यात आलंय.

राज्यात पावसाचा हाहाकार

मागचे काही दिवस पावसाने राज्याला झोडपून काढलंय. यामुळे सामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय. लोकांच्या घरात-शेती-बागायतीमध्ये पाणी शिरून त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेकांच्या डोक्यावरचं छप्परच नाहीसं झालंय. राज्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. थोडक्यात राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालीये.

हा व्हिडिओ पहाः Video | बांदा परिसरात पावसामुळे हाहाकार #Goa #Marathi #News

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!