आमदाराच्या भावाने काँग्रेस प्रवेश केला; आमदार कधी करणार?

सांगे आमदार प्रसाद गांवकर यांचे बंधु संदेश गावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

सांगेः मागील काही दिवसांपासून सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलंय. मात्र सोमावारी प्रसाद गावकरांचे बंधु संदेश शशिकांत गावकर यांनी काँग्रेस प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत प्रसाद गावकरांच्या खाद्यांला खांदा लावून काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनीदेखील काँग्रेसची माळ गळ्यात घालून घेतलीये. त्यामुळे आता प्रसाद गावकर काँग्रेस प्रवेश कधी करतायत याकडे सर्वांचे डोळे लागून राहिलेत.

हेही वाचाः मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामींचं निधन

काँग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या उपस्थितीत प्रवेश

सोमवारी पत्रकार परिषद घेऊन संदेश गावकरांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसंच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी संदेश गावकरांचं काँग्रेस पक्षात स्वागत केलं.

हेही वाचाः PHOTO CAPTION: भारतीय जनता युवा मोर्चा वाळपईतर्फे वृक्षारोपण

संदेश गावकरांच्या काँग्रेस प्रवेशाला सांगे गट काँग्रेसकडून विरोध

दरम्यान सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यास सांगे गट काँग्रेसने विरोध केलाय. याविषयी या गट सदस्यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडताना प्रसाद गावकर हे निष्क्रिय आमदार असल्याने लोक त्यांच्यावर नाराज असल्याचं गट सदस्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन काहीच फायदा होणार नाही असं मत गट समितीचं आहे. तसंच प्रसाद गावकर यांना आता आपण अपक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाही हे उमजून आलतामुळेच ते काँग्रेस पक्षात येऊ पाहतात असल्याचं गट समितीकडून कामतांना यावेळी सांगण्यात आलं होतं. तसंच सांगेविषयी कुठलाही निर्णय घेताना गट समितीला विश्वासात घ्यावं अशी मागणीही या गटाकडून कामतांकडे करण्यात आली होती.

सध्या सांगेत काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Online Education | No Network | ऑनलाईन शाळेला मोबाईल नेटवर्कचीच ‘दांडी’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!