दलालांना इतरांना एजंट म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही

काँग्रेसचे प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांचा पलटवार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः लोकभावना आणि जनादेश डावलून भ्रष्ट, असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजपला २०१७ मध्ये सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या स्वार्थी राजकारणाची आज गोंयकारांना जाण आहे. दलालांना दुसऱ्यांना एजंट म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, असं काँग्रेसचे प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी म्हटलंय.

हेही वाचाः तिसऱ्या लाटेचा धोका! सीमेवरील कोविड चाचणी प्रक्रिया अधिक कडक करण्याची गरज

गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी रविवारी काँग्रेस पक्षाने भाजपचे एजंट बनू नये असं वक्तव्य केलं होतं. त्याचा समाचार घेताना तुलीयो डिसोजा यांनी गोवा फॉरवर्डवर जोरदार पलटवार केला आहे. गोवा फॉरवर्ड हा भाजपचाच परिवार असल्याचं सांगुन, सन २०१७ मध्ये मनोहर पर्रीकरांचं सरकार स्थापन करण्याची दलाली विजय सरदेसाईंनी केली असल्याची आठवण डिसोजा यांनी करुन दिली आहे.

आता गोवा फॉरवर्ड गप्प का?

ओल्ड गोवा येथे वारसा स्थळ नष्ट करुन तिथे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे. परंतु किरण कांदोळकर आणि त्यांचा पक्ष त्याविषयी बोलायला तयार नाहीत. सर्व नियम धाब्यावर बसवुन बेकायदेशीर बांधकामे करण्याच्या प्रयत्नांवर गोवा फॉरवर्ड गप्प का? युनेस्कोकडे सदर बेकायदा बांधकामांविरूद्ध गोवा फॉरवर्ड आता का तक्रार करत नाही? असा सवाल डिसोजा यांनी गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांना विचारला.

हेही वाचाः 60 सदस्यांच्या 6 झोपड्यांना सौर उर्जाचे दिवे व शैक्षणिक साहित्य, नवचेतना युवक संघाचा उपक्रम

गोवा फॉरवर्डने आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं

काँग्रेस पक्षाने सदर बेकायदा बांधकामांविरूद्ध आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सदर बेकायदा बांधकामांविरूद्ध आवाज उठवला आहे आणि आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. गोवा फॉरवर्डने आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, अशी मागणी डिसोजा यांनी केलीये.

हेही वाचाः 1 जानेवारी ते 30 जून, एकूण 141 गुन्हे! किती गुन्ह्यांचा छडा लागला? वाचा सविस्तर आकडेवारी

गोवा फॉरवर्डचं स्वार्थी आणि बेभरवशाचं राजकारण उघड

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंनी रवींद्र भवन ते आर्लेमपर्यंतच्या रस्त्याला स्व. मनोहर पर्रीकरांचं नाव देण्याचं जाहीर केलं होतं. गोवा फॉरवर्ड आज भ्रष्ट आणि यु-टर्न स्पेशलीस्ट स्व. मनोहर पर्रीकरांचा वारसा पुढे नेत असल्यानं आता राजकीय सोयीसाठी विजय सरदेसाईंनी अचानक यु-टर्न घेत सदर रस्त्याला ‘फॉरवर्ड ॲवन्यू’ असं नाव दिलं आहे. यावरुन त्यांचं स्वार्थी आणि बेभरवशाचं राजकारण उघड होतं.

हेही वाचाः तालिबानी ‘झलक’ ; तुरुंग फोडून 5000 दहशतवाद्यांना दिलं सोडून !

यावरुन गोवा फॉरवर्डचं बेगडी राजकारण उघड

गोवा फॉरवर्डचे साळगांवचे आमदार भाजप प्रवेशाची तयारी करत असून स्वतः किरण कांदोळकर भाजपात घर वापसी करण्याचा मुहूर्त शोधत आहेत. माजी आमदार किरण कांदोळकरांना एका कर्नाटकी व्यक्तीच्या इशाऱ्यावर गोंयकारपणाच्या घोषणा द्याव्या लागतात. यावरुन गोवा फॉरवर्डचं बेगडी राजकारण उघड होतं. आज गोंयकार जनतेचा विश्वासघात केलेल्या गोवा फॉरवर्डला धडा शिकवण्याची वाट पाहत आहे, असं डिसोझा म्हणालेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MICKY PACHECO| मिकी पाशेकोंचा बिनशर्त काँग्रेस प्रवेश- दिनेश राव

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!