किनाऱ्यावर मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ, हत्या झाल्याचा संशय

मृताच्या डोक्याला जबर मार लागल्याचं समोर

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्को : दक्षिण गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. दांडो वेळसांवच्या किनाऱ्यावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दांडो वेळसांव इथल्या किनाऱ्याच्या अखेरच्या टोकावर हा मृतदेह आढळून आलाय. प्रथमदर्शनी हा मृतदेह पाहता या इसमाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

मृताच्या डोक्यावर वार?

दांडो वेळसांवच्या किनाऱ्याच्या एका टोकाला रविवारी रात्री मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कळताच वेर्णा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. यावेळी मृत व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागल्याचं आढळून आलं. त्यावरुन कुणीतरी या इसमाच्या डोक्यावर वार करुन त्याची हत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – साट्रे सत्तरीत स्ट्रॉबेरीचं उत्पादन यशस्वी, युवा शेतकरी श्याम गांवकरांची किमया

कुणी केली हत्या?

दरम्यान हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. वेर्णा पोलिस या संपूर्ण घटनेप्रकरणी अधिक तपास करत असून नेमकी याप्रकरणी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा – एकच नंबर! वयाच्या अवघ्या 21 वर्षी बनणार महापौर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!