भीषण! श्रीपाद नाईकांच्या गाडीला अपघात, पत्नी आणि सचिवाचा मृत्यू
अपघातात श्रीपाद नाईक गंभीर जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयूषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची बातमी धडकली आहेत. या अपघातात त्यांच्या पत्नी आणि निजी सचिव ठार झाल्याची माहिती असून श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी आहेत. यल्लापूरा येथे हा अपघात झाल्याची खबर आहे. माजी खासदार एड. नरेंद्र सावईकर यांनी भाऊंच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे ट्वीट केले आहे. या अपघाताची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही.
गोकर्ण येथे जात असताना अपघात झाल्याची माहिती

गाडीचा चक्काचूर

सविस्तर वृत्त लवकरच

दरम्यान त्यांना तत्काळ गोव्यात जीएमसीत आणण्याची तयारी सुरु असल्याचं कळतंय. गोमेकॉत डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क केल्याचंही कळतंय.